भारत पाकिस्तानमध्ये झालेला नेहरू लियाकत करार काय होता?

दिल्ली:   भारत १९४७ रोजी स्वतंत्र झाला. भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र राष्ट्र उदयास आहे. १९४७ ला फाळणी झाल्यानंतर अनेक हिंदू मुस्लीम स्थलांतरीत झाले. त्यांचे जीवनमान विस्कळले. यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. दोन्ही देश एकमेकांविरोधात पेटून उठत होते, छोट्या मोठ्या दंगली होत होत्या. दोन्ही देशात अशांततेचं वातावरण होतं.अशावेळी यावर उपाय म्हणून त्यावेळचे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खा यांनी भारत पाकिस्तानाच्या हितासाठी एक करार केला. हा करारच नेहरू लियाकत करार म्हणून ओळखला जातो. सहा दिवस सुरू असलेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी हा नेहरू लियाकत करार करण्यात आला.



नेहरू लियाकत करार काय होता?

या करारात अल्पसंख्याक लोकांना विशेष महत्त्व देण्यात आले होते. अल्पसंख्याक लोकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, त्यांना स्वातंत्र्य, समानता मिळावी, असे या कराराक होते.याच कराराद्वारे अल्पसंख्याक लोकांसाठी दोन्ही देशांनी अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली.याशिवाय या कराराद्वारे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहणे आणि तशी परिस्थिती ओढावली तर त्यावर योग्य ते उपाययोजना करणे.

या करारामुळे पुढे काय झाले?

या करारानंतर दोन्ही देशातील दुषित वातावरण आता शांततेत बदलले. दोन्ही देशातील अशांतता नष्ट झाली. दंगली बंद झाल्या. कराराअंतर्गत करण्यात आलेल्या अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने