महाराष्ट्र-कर्नाटकसह 'या' राज्यांत पावसाची शक्यता; IMD चा सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात  मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासांत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात , तर पुढील 4 दिवसांत केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस दिल्ली-एनसीआरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. मात्र, पावसाची फारशी शक्यता नाही. तापमानात हळूहळू वाढ होईल. शनिवारी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.'



महाराष्ट्रात पावसाची शक्यता

आज मुंबई, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी इथं काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग 30-40 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस  पडू शकतो.या अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशामध्ये कमाल तापमान 38-40°C च्या श्रेणीत आहे. तर वायव्य भारत, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तापमान सामान्यपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसनं कमी होतं.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील चार दिवसांत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये तापमानात हळूहळू 2-4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि अंतर्गत भागात विस्तारण्याची शक्यता आहे. ओडिशा वगळता देशातील बहुतांश भाग पूर्वपदावर येतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने