'बाळासाहेब बाबरी कांड प्रकरणात प्रमुख आरोपी होते, हे भाजपला माहिती नाही का?'

मुंबई: बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.संजय राऊत म्हणाले की, अयोध्येतून आलावर चंद्रकांत पाटील सांगतात की बाबरीसंदर्भातील त्या घटनेत शिवसेनेचा आणि शिवसेनाप्रमुखांचा काडीमात्र संबंध नव्हता. ते फार कुचेष्ठेने बोलले. यावर मिंधे काय म्हणतात हे आम्हाला ऐकायचं आहे. महाराष्ट्र आणि देश ऐकू इच्छितोय कि मिंधे काय बोलून हिम्मत दाखवतायत का की परत एकदा शरण जातायत असे संजय राऊत म्हणाले.



आयोध्याच्या संदर्भात आणि त्यानंतरच्या घडामोडीत हिंदूत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला त्याग या देशाला माहितेय आणि त्याच त्यागातून भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे असेही संजय राऊत म्हणाले.बाळासाहेब ठाकरे त्या बाबरी कांडानंतर लखनऊला जाऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले होते, त्यातील ते प्रमुख आरोपी होते. हे भाजपला माहिती नाही का? असा सवाल देखील संजय राऊतांनी भाजपला केला.इतक्या वर्षांनी बोलण्याची गरज काय होती. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे होते. हे सगळे पळपुटे आहेत. ही मुद्दाम बाळासाहेब आणि शिवसेनेवर केलेली चिखलफेक आहे. शिवसेनेचं आस्तित्व संपवण्यासाठी चाललेले हे खेळ आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते

"त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते," असं चंद्रकांत पाटील मुलाखतीवेळी बोलताना म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने