महात्मा फुले यांच्यामुळे शिवजयंती साजरी होऊ लागली, कसा झाला होता उत्सव ?

मुंबई: आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. सत्यशोधक, स्त्री शिक्षणाचे जनक, एक मोठे समाजसेवक होते. त्यांनी संपुर्ण आयुष्य समाजाच्या हितासाठी वाहले. त्यांचा जन्म पुणे येथे ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्यांचे कुटूंब फुलांचा व्यवसाय करायचे त्यामुळेच त्याचं आडनाव फुले असे पडले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात समाज हिताची अनेक कामे केली. १८५४ रोजी पुण्यात स्त्रियांसाठीची पहिली शाळा सुरू केली. कधी शेतकऱ्यांसाठी तर कधी दलितांसाठी त्यांनी आवाज उचलला. विशेष म्हणजे शिवजयंती साजरी करण्याची सुरुवातही फुलेंनीच केली. आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

 


शिवजयंती हा आपला महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण असतो. शिवजयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो पण तुम्हाला माहिती आहे का पहिली शिवजयंती कशी साजरी करण्यात आली आणि पहिल्या शिवजयंतीची सुरुवात कशी झाली?१८९५ मध्ये लोकमान्य टिळकांनी समाजात एकोपा वाढवण्यासाठी शिवजयंती उत्सव साजरा केला. ही राष्ट्रीय एकात्मता इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत होणार, या उद्देशाने शिवजयंती साजरी करण्याचे ठरविले पण त्याआधी महात्मा फुले यांनी शिवजयंतीची सुरुवात केली. १८७० रोजी महात्मा फुले यांनी पुण्यात पहिली शिवजयंती साजरी केली.महात्मा फुले यांनी १८६९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथील समाधी शोधून काढली आणि शिवरायांवर त्यांनी पहिला पोवाडा लिहला. येथूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि १८७० रोजी पुण्यात पहिली शिववजयंती साजरी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने