IPL वर टांगती त:लवार! वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने लीग होणार रद्द? अधिकारी चिंतेत

मुंबई: भारतात सध्या सर्वत्र आयपीएलची चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत.दरम्यान ही स्पर्धा सुरु असतानाच आयपीएलवर कोरोनाचे काळे ढग जमा झाले आहेत.वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने लीग रद्द होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात धाकधुक निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी, भारताचा माजी क्रिकेटपटू, प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. यामुळे पुढील काही दिवस प्रेक्षकांना आकाश चोप्रा यांची कॉमेंट्री ऐकता येणार नाही.



अशातच वाढती रुग्णांची संख्या पाहून वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर बीसीसीआच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बीसीसीआयने आता संघ मालक, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोविड-19 रोखण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेण्यास सांगितले आहे.आम्हाला माहित आहे की कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, काळजी करण्यासारखे काही नाही. आम्ही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा आमच्यासाठी सर्वोपरि आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. कोरोना असे पर्यंत सर्व नियमांचे पालने केले जाईल. अस बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांच्या चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. 163 दिवसांनंतर एका दिवसात चार हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.बुधवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात 4,435 लोकांना कोरोनाच लागण झाली आहे. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने