दामलेंनी करुन दिली बालगंधर्वांची आठवण!, असा रंगला नव्या नाटकाचा पहिला प्रयोग..

मुंबई: प्रशांत दामलेंचं नवं नाटक 'नियम व अटी लागू' नुकतंच आपल्या भेटीला आलं आहे. युवा लेखक व अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं ते लिहिलं आहे तर निर्मिती प्रशांत दामले यांची आहे.सध्या सोशल मीडियावर या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारातून आत जाणाऱ्या प्रेक्षकांची झुंबड उडालेली दिसत आहे. आणि व्हिडीओत दिसणाऱ्या त्या गर्दीवर नजर गेली की रसिक प्रेक्षकाला आठवतायत बालगंधर्व. असं काय वेगळं घडलं दामलेंच्या नाट्यप्रयोगला ज्यामुळे प्रेक्षकांना बालगंधर्व आठवले..तर आपल्यापैकी अनेकांना ऐकून किंवा वाचून माहित असेल की बालगंधर्वांच्या नाटकांना जो प्रेक्षकवर्ग यायचा तो प्रवेशद्वाराशीच सुगंध सोबत घेऊन आनंदात नाट्यानुभव घ्यायला थिएटरात जायचा. त्यावेळी प्रेक्षकांवर अत्तर शिंपडलं जायचं..आणि वातावरण सुगंधानं भारलेलं असायचं..तसंच काहिसं दामलेंच्या नव्या नाटकाच्या म्हणजे 'नियम व अटी लागू' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला केलेलं दिसून आलं. 



प्रेक्षकांना नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी मोगऱ्याचा गजरा आणि अत्तर दिलं गेलं. आणि आलेल्या मायबाप प्रेक्षकाला घरचं फिलिंग आलं...माणूस हा असा प्राणी आहे की, सामान्यपणे तो कोणत्याही मानवी नियमांत बसत नाही. कालचा माणूस आज वेगळा भासतो. कोणत्या प्रसंगी आपण कसे वागू हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे सांगणे आणि स्वतः वागणे यात फरक पडतो. थोडक्यात काय तर नियम व अटींच्या बाबतीत विचाराच्या, वागण्याच्या बाबतीत ठामच असावे, असा हट्ट अनेकदा चुकीचा ठरतो.सोयीनुसार नियमातून पळवाट काढताना अटींचा भंग होऊ शकतो. हे माहीत असूनही नियम व अटी लागू केल्या जातात. त्यात जर या नियम व अटी नवरा व बायकोच्या नात्याला लागू करायच्या असतील तर काय. 

नियम अटींची ही कसरत पार पाडताना एका जोडप्याची होणारी तारांबळ पाहायची असेल तर निर्माते प्रशांत दामले यांनी भन्नाट नियम व मजेशीर अटींसह रंगभूमीवर आणलेलं ‘नियम व अटी लागू’ हे आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक चुकवू नका.नाटकातील नियम व अटींच्या बाबतीत सदैव जागरूक असणारे निर्माते प्रशांत दामले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि आपल्या खुमासदार लेखणीने नियम व अटींचा लेखाजोगा मांडणारे युवा लेखक संकर्षण कऱ्हाडे या त्रयीचं हे नाटक आहे. स्वत: संकर्षण कऱ्हाडे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने