वंचित विद्यार्थ्यांना पुन्हा देता येणार 'या' तारखेला एमबीएची सीईटी परीक्षा

नाशिक : एमबीए प्रवेशासाठीच्या सीईटीपासून (MBA CET) तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहेयेत्या २७ एप्रिलला या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. तसे सुचनापत्र सीईटी सेलने जारी केले आहे. याबाबत आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.राज्यात एमबीएच्या प्रवेशासाठी नुकतीच सीईटी परीक्षा झाली. यामध्ये नाशिकसह राज्याच्या विविध भागांत गोंधळ झाल्याच्या तक्रारी होत्या. नाशिकमध्ये एका केंद्रात ४० मिनिटे आधीच ऑनलाईन पेपर सबमिशन बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर जमा करणेदेखील शक्य झाले नव्हते.



या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसह आमदार फरांदे यांची भेट घेऊन मदतीसाठी साकडे घातले होते. आमदार फरांदे यांनी तत्काळ दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व सीईटी सेलच्या आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, तसेच लेखी पत्रदेखील दिले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन येत्या २७ ला पुनर्परिक्षा होणार असून, त्यासाठी अर्ज करण्यास ११ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने