बराक ओबामा स्वत:जवळ हनुमानाची मूर्ती का ठेवतात ?

अमेरिका:अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कारकिर्दीत अमेरिकेने अनेक महत्त्वाची लक्ष्ये गाठली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ९-११च्या हल्ल्यातील आरोपी ओसामा बीन लादेनची हत्या.जगातील महासत्तेचा अध्यक्ष असूनही बराक ओबामा एका देवाची पूजा करतात. त्या देवाचं नाव ऐकलं तर देवभोळ्या भारतीयांनाही अभिमान वाटेल. तो देव म्हणजे हनुमान, ज्याची आज जयंती आहे.ओबामा स्वत:सोबत एक हनुमानाची मूर्ती ठेवतात असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. एका हिंदू महिलेने त्यांना ही मूर्ती दिली होती.



याशिवाय ओबामा यांच्याकडे एका भिक्खूने दिलेली बुद्धांची मूर्ती, पोप फ्रान्सिस यांनी दिलेली मानकांची माळ आहे. या गोष्टी कायम त्यांच्या खिशात असतात. त्यांनी त्या मुलाखतीदरम्यान दाखवल्या होत्या.ओबामा यांची आई कंसास एक श्वेत महिला होती. त्यामुळे ओबामांच्या आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे इंडोनेशियात गेली. तिथे हिंदू हा एक लोकप्रिय धर्म आहे.मुलाखतीमध्ये ओबामांनी सांगितले होते की, जेव्हा त्यांनी कार्यालयात जाण्यास सुरुवात केली तेव्हापासून लोक त्यांना काही ना काही वस्तू देत आले आहेत ज्या त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात.

त्यापैकी काही गोष्टी ओबामा आपल्या सोबत ठेवतात. यामुळे त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करण्याची ताकद मिळत असल्याचं ओबामांचं म्हणणंय. पण एवढं असूनही आपण अंधश्रद्धाळू नसल्याचा दावा ते करतात. या चिन्हांच्या निमित्ताने ती देणाऱ्या व्यक्तींची आणि त्यांनी सांगितलेल्या कथांची आठवण होत असल्याचे ते सांगतात.त्यामुळे अमेरिका हा पुढारलेला देश म्हणून कौतुक असणाऱ्यांसाठी महासत्तेच्या अध्यक्षाने इतकं अंधश्रद्धाळू असणं तसं धक्कादायकच.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने