सुषमा अंधारे व राखी सावंत दोघी बहिणी; एकमेकींच्या स्पर्धक - मोहित कंबोज

मुंबई: भाजपा नेते मोहित कंबोज सातत्याने आपल्या ट्वीटमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा एक ट्वीट केलं आहे, ज्यामुळे आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे. कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे.मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याची टीका केली आहे. तसंच दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचंही मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.



आपल्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज म्हणतात,"सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात, या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत. दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने