चोरीचा पैसा नसेल, तर आयटी, ईडीची भीती का ?

बंगळूर : काँग्रेसवाल्यांकडे चोरीचे पैसे नसतील तर आयटी-ईडीला त्यांनी घाबरण्याचे कारणच काय, असा सवाल करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज काँग्रेस नेत्यांना टोला लगावला. कॉंग्रेस नेत्याना टार्गेट करून त्यांच्या निासस्थनावर छापे टाकण्यासाठी आयटी, ईडी अधिकारी बंगळूरला आल्याच्या कॉंग्रेस नेत्यांच्या आरोपावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. सर्व काही आयोगांतर्गत होते. प्रोटोकॉलनुसार प्रत्येक जिल्ह्यात आयटी अधिकारी आधीच हजर असतात. 



निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार छापे सुरू आहेत. ते पैसे, सोने आणि साहित्य जप्त करत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस छाप्याबद्दल बोलत आहेत, हे योग्य नाही. भोपळा चोराला का हात लावायचा, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.ते म्हणाले, ‘‘भाजपवर आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे आरोप योग्य नाहीत. चोर असेल त्याला पकडले जाईल. आयटी छाप्यांचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजप पराभवाच्या भीतीने हा छापा घालत असल्याच्या आरोपात काहीही तथ्य नाही. भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. प्राप्तिकर छाप्याची तीव्रता कमी करण्यासाठी काँग्रेसने छाप्यापूर्वी असे वक्तव्य करून अधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे.’’

अभिनेता सुदीपकडून प्रचार?

अभिनेता सुदीपच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत बोम्मई यांनी एवढेच सांगितले की, सुदीपच्या समावेशाबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर न दिल्याने त्या प्रवेशाबाबत चर्चा रंगली आहे. मात्र त्यांनी सुदीप निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार असल्याचे संकेत दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने