नाट्यगौरव पुरस्कारात वंदना गुप्ते यांना 'जीवनगौरव' देताना पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट

मुंबई: यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२३’ पुरस्कार सोहळा खुप खास असणार आहे. या सोहळ्यामध्ये मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत कलावंत करणार रसिकांचं मनोरंजन करणार आहेत.यंदाच्या झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर त्याचा उलगडा झालाय.

मराठी नाट्यसृष्टीतील अभिनेत्री वंदना गुप्ते यांना यंदाचा झी नाट्य गौरव जीवनगौरव पुरस्कार मिळालाय.२५ डिसेंबर १९७० रोजी, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी, द गोवा हिंदू असोसिएशनच्या, मंगला संझगिरी दिग्दर्शित ‘पद्मश्री धुंडीराज’ ह्या नाटकातून वंदना गुप्ते पहिल्यांदा रंगमंचावर दाखल झाल्या. तिथपासून ते ‘.. आणि वंदना गुप्ते’, ह्यांचा इथपर्यंतचा प्रवास खूप कष्टांचा होता.झी नाट्य गौरव जीवनगौरव पुरस्कार निमीत्ताने मराठी रंगभूमीवरच्या सर्वात तरुण अभिनेत्रीला जीवनगौरव पुरस्कार मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेलतसेच या सोहोळ्यात प्रेक्षकांना मराठी नाट्यसृष्टीत आघाडीचा नट शैलेंद्र दातार, उमेश जगताप आणि सुबोध भावे ‘अश्रूंची झाली फुले' ह्या नाटकातील प्रवेश सादर करणार आहे





तसेच तब्बल २५ वर्षानंतर संतोष पवार 'यदा कदाचित' ह्या नाटकाचा प्रवेश कमलाकर सातपुते, आशिष पवार, शलाका पवार आणि संजय खापरे सारखे कलाकार साकारणार आहेत,याशिवाय विनोदाचा हुकमी एक्का आणि गेली २५ वर्ष रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेले नाटक "सही रे सही" नाटकाचा प्रवेश भरत जाधव सादर करणार आहे.‘चारचौघी’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश संवेदनशील अभिनेत्री मुक्ता बर्वे साकारणार असून ह्या नाट्यप्रवेशाच्या माध्यमातून मुक्ता बर्वे ह्या वंदना गुप्ते यांना मानवंदना देणार आहे.सोबत प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्या ‘मन्या आणि मनीची’ धमाल अनुभवता येणार आहे. यंदाच्या झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे लेखन संकर्षण कऱ्हाडे केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने