पेपरमधली बातमी वाचून शरद पवारांचं केंद्राला पत्र

मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय दुग्ध मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयीची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.शरद पवार यांनी या पत्राबद्दलचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये पवार म्हणतात, "आज मला टाईम्स ऑफ इंडिया मधील एक बातमी मिळाली (हीबातमी यासोबत जोडलेली आहे) ज्यामध्ये केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा लोणी आणि तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा इरादा आहे."



"या संदर्भात केंद्र सरकारचा कोणताही निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य असेल. कारण या उत्पादनांच्या आयातीचा थेट देशांतर्गत दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. दुग्ध उत्पादक शेतकरी अलीकडेच कोरोनाच्या संकटातून बाहेर आले आहेत आणि अशा निर्णयामुळे डेअरी क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गंभीरपणे अडथळा निर्माण होईल", अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली आहे.कृपया माझ्या चिंतेकडे लक्ष द्यावे. या प्रकरणाकडे लक्ष दिल्यास आणि मंत्रालयाने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा कोणताही निर्णय घेण्यापासून परावृत्त केल्यास मला आनंद होईल, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने