OPEC प्लसचा भारताला धक्का; रशिया येणार मदतीला धावून

 दिल्ली: मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमत पुन्हा एकदा कमी होऊ लागल्या होत्या आणि आधीपासून महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांच्या मनात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलही स्वस्त होईल अशा अपेक्षा जागु लागल्या होत्या. मात्र, आता या अपेक्षांना मोठा फटका बसला आहे. जगभरातील तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या OPEC ने अचानक एक मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया रशियासह जगातील अन्य ओपेक + देशांनी रविवारी अचानक तेल उत्पादनात प्रतिदिन 16 लाख बॅरलची कपात करण्याची घोषणा केली आहे. ओपेक + च्या या निर्णयानुसार, रशिया प्रतिदिन 5 लाख बॅरेल तेल उत्पादनात कपात करेल.ओपेक प्लस देशांच्या या निर्णयामुळे तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होईल. अमेरिकेने ओपेक प्लसचा हा निर्णय योग्य नसल्याच मत नोंदवल आहे.



भारत एकूण गरजेच्या 80 टक्क्यापेक्षा जास्त तेल आयात करतो. त्यामुळे सहाजिकच ओपेक प्लसच्या या निर्णयाचा भारतीय तेल बाजारावर परिणाम होईल.लंडन स्थित एनर्जी कार्गो ट्रॅकर वोर्टेक्सानुसार, मार्च महिन्यात भारताला सर्वात जास्त तेल पुरवठा रशियाने केला आहे. रशियाकडून सर्वाधिक तेल पुरवठ्याचा हा सलग सहावा महिना आहे. रशियाने मार्च महिन्यात भारताला प्रतिदिन 16 लाख बॅरल तेल निर्यात केलं. भारताच्या एकूण तेल आयातील 35 टक्के वाटा रशियाचा आहे.भारतीय तेल बाजाराशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल उत्पादनात कपात करण्याच्या ओपेक प्लसच्या या निर्णयाचा भारतावर परिणाम होणार नाही. कारण भारत रशियाकडून तेल आयात वाढवेल. भारत-रशियामध्ये तेलाच्या पेमेंटमध्ये काही अडचणी आहेत. पण त्यावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहेत.

ओपेक आणि ओपेक+ म्हणजे काय?

ओपेक म्हणजे Organization of the Petroleum Exporting Countries (OPEC) अर्थात तेलाची निर्यात करणाऱ्या देशांची संघटना. ओपेक संघटनेत मूळ 13 सदस्य आहेत.1960 च्या दशकात एक कार्टेल म्हणून म्हणजे एकमेकांशी स्पर्धा न करता भाव निश्चित करून सगळ्यांचा फायदा वाढवण्यासाठी ओपेकची स्थापना झाली.जगातील तेलाच्या एकूण उत्पादनापैकी 30 % उत्पादन याच देशांतून होतं. त्यात दिवसाला 1 कोटी बॅरलपेक्षा तेल उत्पादन करणारा सौदी अरेबिया सर्वात आघाडीवर आहे.त्यामुळे तेलाचं उत्पादन करणारे सगळेच देश ओपेकचे सदस्य नसले, तरीही तेलाच्या किंमतींवर ओपेकचंच नियंत्रण दिसून येतं.2016 साली तेलाच्या किंमती घसरल्या, तेव्हा आणखी दहा देशांनी ओपेकशी हातमिळवणी केली. यालाच ‘ओपेक प्लस किंवा ओपेक+’ गट म्हणून ओळखलं जातं. जगातील 40 % तेल उत्पादन या ओपेक+ गटातले देश करतात.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने