"OYO मध्ये मुली हनुमानाची आरती करायला जात नाहीत, त्या..."; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वक्तव्य

चंदीगढ : "आपल्या मित्रांसोबत OYOमध्ये मुली हनुमानाची आरती करायला जात नाहीत, त्यांना याबद्दल कल्पना असतेच पण त्यांनी आपली काळजी घ्यायला पाहिजे." असं मत हरियाणा येथील महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सध्या रंगली आहे.हरियाणा येथील कैथल जिल्ह्यातील RKSD कॉलेजमध्ये सायबर क्राईम जागृती कार्यक्रम पार पडला. यामध्ये हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी सायबर क्राईम आणि महिलांच्या छळासंदर्भात मार्गदर्शन केले. लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यामध्ये बदल करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.



दरम्यान, प्रेमाच्या नावाखाली अनेकांचे शारिरीक छळ होत असतात. OYOला मुली हनुमानाची आरती करण्यासाठी जात नसतात. त्यांनी अशा ठिकाणी जाताना काळजी घ्यायला पाहिजे. आपल्यासोबत वाईट होऊ शकतं याचाही विचार मुलींनी करायला हवा. आमच्याकडे जेवढ्या केसेस येतात त्यापैकी अनेक केसेस या लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भातल्या असतात. त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही पण हे प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण करत असतो." असं त्या म्हणाल्या."लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायद्यामुळे गुन्ह्याची संख्या वाढली असून त्यामुळे कुटुंबामध्येसुद्धा वाद होत असतात. या कायद्यामध्ये बदल होण्याची सध्या गरज आहे." असं मत हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी व्यक्त केलं आहे.त्याचबरोबर आपल्या मित्रासोबत OYOला जाताना मुलींनी त्यांच्यासोबत काहीही बरं वाईट होऊ शकतं याची काळजी घेतली पाहिजे असं भाटिया यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने