भाजपला पराभवाची भीती? Exit Poll जाहीर होताच कर्नाटकात मोदींच्या तब्बल 20 सभा!

कर्नाटक: कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आलाय, त्यामुळं स्टार प्रचारक म्हणून पक्षाच्या राज्य युनिटनं पंतप्रधान मोदींच्या  किमान 20 रॅलींचं नियोजन केलंय.कर्नाटकात 10 मे रोजी राज्यातील सर्व 224 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 8 मे दरम्यान राज्यात तळ ठोकू शकतात. या दरम्यान ते काँग्रेस  आणि जेडीएसच्या  बालेकिल्ल्यात प्रचार करू शकतात.



काँग्रेस आणि जेडीएस राज्यातील सत्ताधारी भाजपविरोधात  संपूर्ण रणनीती बनवत आहेत, त्यामुळं त्यांना सत्ताविरोधी लाटेशी लढावं लागणार आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांची जादू निवडणूक जिंकण्यास मदत करू शकते, असं पक्षाच्या रणनीतीकारांचं मत आहे.राजकारणाच्या दृष्टीनं कर्नाटकची सहा झोनमध्ये विभागणी करण्यात आलीये, त्या प्रत्येकामध्ये किमान तीन सभा घेण्याची पंतप्रधान मोदींची योजना आहे. हैदराबाद-कर्नाटकच्या काही भागात, जिथं जवळपास 40 विधानसभेच्या जागा आहेत, तिथं पंतप्रधानांच्या आणखी रॅली होऊ शकतात.हैदराबाद-कर्नाटक हा प्रदेश काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रदेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला इथं फारसं यश मिळालं नाही. पक्षाला इथं केवळ 15 जागा जिंकता आल्या. पंतप्रधान मोदी यांनीही कर्नाटकला आपल्या अजेंड्यात सर्वोच्च स्थान दिलंय. मोदींनी निवडणूक तारखांच्या आधी हुबळी, मंड्यासह विविध ठिकाणी सात सभा घेतल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने