चुकीला माफी नाही! सरकारला पाठिंबा देऊनही हनुमान चालिसा प्रकरणी राणा दाम्पत्याला 'दिलासा' नाही

मुंबई: उद्धव ठाकरे यांने निवासस्थान मोतोश्रीबाहेरच्या हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या दोघांच्या विरोधात आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले आहे. आमच्या विरोधातील गुन्हा रद्द व्हावा अशी मागणी, राणा दाम्पत्याने केली होती. यावर पोलिसांनी सविस्तर उत्तर दिले आहे. दाखली केलेली याचिका खोट्या एफआयआरवर दाखल होती, हा राणा दाम्पत्याचा दावा पोलिसांनी फेटाळला आहे.



साक्षीदार शासकीय कर्मचारी आहेत. सीआरपीसी कलम ३१३ नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे, असे पोलिसांना न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणी २८ एप्रिला पुढील सुनावणी होणार आहे. अमरावती प्रदेशातील अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी मुंबई गाठले होते. या दोघांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी तळ ठोकला होता. तर खार परिसरातील राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जमून घोषणाबाजी सुरू केली होती. शिवसैनिकांनी बॅरिकेडिंग तोडून राणा यांच्या इमारतीतही प्रवेश केला. मात्र, पोलिसांनी त्यांना राणा दाम्पत्याच्या घरापर्यंत पोहोचू दिले नव्हते. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने