अजित पवारांच्या Not Reachable भूमिकेवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई: अजित पवार काल दुपारपासून नॉटरिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चांगली खळबळ उडाली. दरम्यान, ते पुण्यात दिसले. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषत घेत मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली.शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अदानी हिंडेनबर्ग प्रकरणावर भूमिका मांडली. अदानी प्रकरणापेक्षा बेरोजगारी शेतीचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, असं पवार म्हणाले. दरम्यान अजित पवारांच्या नॉटरिचेबलबद्दल विचारले असता. एकाच वाक्यात उत्तर दिले.



अजित पवार तुमच्या समोर नाहीत म्हणजे ते नॉटरिचेबल नाही. असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.अजित पवार आणि ७ आमदार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंड केलं होतं. अशाच प्रकारचं बंड तर नव्हे ना, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. दरम्यान आज अजित पवार पुण्यात दिसले.

अजित पवार होते कुठं?

नॉट रिचेबलच्या वृत्तानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत स्वतः माहिती दिली. जागरणं माझी जास्त झाली पित्ताचा त्रास होतो. मी औषध घेऊ झोपलो होतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने