भाजप-शिंदे गटामध्ये नाराजीनाट्य सुरू? भाजप खासदाराने व्यक्त केली खंत

मुंबई: राज्यात काही महिन्यांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आहेत. दोन्ही पक्षात नाराजीचे सुर अनेक वेळा ऐकू येत असतात.दरम्यान दोन्ही पक्षातील नेत्यांकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त होत नाही. आता मात्र भाजप खासदाराने शिंदे गटाच्या मंत्र्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. यामुळे युतीतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. भाजप खासदारने शिवसेनेच्या मंत्र्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.



जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्याअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमांचा धडाका पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लावला आहे. मात्र या कार्यक्रमांना जिल्ह्यातील भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन व इतर खासदारांना बोलवलं जात नाही. भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटलांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

जल जीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेली योजना आहे. या योजनेसाठी केंद्राने पैसे दिले आहेत. त्यामुळे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांना व जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांना बोलवल्या समाजामध्ये चांगलं चित्र निर्माण होईल, जलजीवन मिशन योजनेचे कार्यक्रम सर्वसमावेशक व्हावे अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे.शिवसेनेवर होत असलेले खोके, ओके वगैरे आरोप दूर करायचे असेल व खरोखर चांगलं काम दाखवावे लागणार आहे. कामाच्या माध्यमातून आरोप दूर करता येईल, असे उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने