बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उतरणार ‘ही’ महिला उमेदवार

मुंबई: बिग बॉस फेम आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आता राजकारणात उतरणार असल्याचं दिसून येत आहे. तृप्ती देसाई यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. 15 वर्षे बारामतीत घराणेशाहीच सुरु आहे. सुप्रिया सुळे यांनी कधीच कार्यकर्त्यांचा विचार केला नाही असं तृप्ती देसाई यांनी म्हंटलं आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेला बदल हवा आहे. तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई असणार आहे असंही तृप्ती देसाई यांनी म्हंटलं आहे. तृप्ती देसाई यांच्या या भूमिकेमुळे त्या भाजपात प्रवेश करणार का ? या चर्चांना आता उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार तृप्ती देसाई असणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दुसरीकडे आम आदमी पार्टीकडूनही तृप्ती देसाई यांना पक्षात येण्याचं आमंत्रण दिलं आहे.



भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून आपण इच्छूक असल्याचे सांगत त्यांनी घराणेशाहीच्या विषयावरून पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. बारामती मतदारसंघात घराणेशाहीचं राजकारण असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून आपण इच्छूक असल्याचे सांगत आपल्याला आम आदमी पक्षाकडूनही ऑफर असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगलं असल्यामुळे आता भाजपलाही लोकांची पसंदी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आपण बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून आम आदमी पक्षाकडूनही मला ऑफर आली आहे असंही तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षानं जर मला संधी दिल्यास मी ती ऑफर नाकारणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने