'सामना' वृत्तपत्र बंद करण्यासाठी केंद्रीयमंत्री आक्रमक; म्हणाले कोर्टात...

मुंबई:  सध्या भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वाद चांगलाच चिघळल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणाल्यापासून वाद वाढला असून फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. त्यातच आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.



नारायण राणे म्हणाले की, मी एक वृत्तपत्र घेतला. त्याच नाव आहे सामना. मी याला वृत्तपत्र म्हणणार नाही. पत्रकारांनी आजचा सामना वाचावा. त्यात जनतेच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या हिताचं काय आहे हे सांगावं. तसेच सर्वसामान्य जनतेला ही भाषा आवडेल आणि रुचेल अशी भाषा आहे का हे पाहावं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असं वृत्तपत्र राज्यात चालू राहावं, याचा विचार करून यासंबंधी योग्य कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली.दरम्यान प्रेस कौन्सिलकडे कोणी तक्रार केली नाही, तर मी तक्रार करणार, असा इशाराही राणे यांनी दिला. तसेच वेळ पडली तर कोर्टात जाणार असंही राणे म्हणाले. राणे पुढं म्हणाले की, ठाण्यात एक घटना घडली. त्यानंतर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. फार अस काही भयाणक घडल, असं चित्र तयार करण्यात आल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने