उद्धव ठाकरेंची काळजी घेणारी 'ती' व्यक्ती कोण?

छत्रपती संभाजीनगर: राज्यात छत्रपती संभाजीनगर येथे झालेली मविआची वज्रमूठ सभा चांगलीच गाजली. विरोधकांच्या भाषणानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, या सभेत एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उद्धव ठाकरेंच्या खुर्चीमागे एक व्यक्ती दिसली. सावलीसारखा त्यांच्यासोबत दिसला. तर काळजी घेण्यासाठी थापासारखा दिसणारा हा व्यक्ती कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकासआघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. उद्धव ठाकरे हे खुर्चीवर बसले असताना त्यांच्या मागे एक व्यक्ती उभी होती. ही व्यक्ती उद्धव ठाकरे यांची काळजी घेताना दिसून आला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासगी सुरक्षारक्षक रजपूत, रविंद्र म्हात्रे आणि खासगी सचिव मिलिंद नार्वेकर असतात. आता यांच्यासोबत थापा हा काळजीवाहक म्हणून दाखल झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत वावरणाऱ्या थापाच्या खांद्याला नेहमी एक पिशवी असते. या पिशवीत काही औषधं असल्याचे सांगितलं जात आहे.

बाळासाहेबांच्या सेवेसाठी....

मुंबईचे नगरसेवक किम बहादूर थापा यांनी बाळासाहेबांच्या सेवेसाठी चंपासिंग थापा यांना नेपाळवरून आणले होते. गेली अनेकवर्षे चंपासिंग थापा यांनी बाळासाहेबांची सेवा केली. प्रत्येक दौऱ्यांमध्ये चंपासिंग थापा बाळासाहेबांची औषधे, प्रत्येक कार्यक्रमात त्यांना काय पाहिजे काय नको आदी सर्व सेवा करताना बाळासाहेब ठाकरेंची सावली झाली होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने