वातावरण तापलं! ठाकरे गटाच्या खासदार-आमदारांना बारसूला जाण्यापासून पोलिसांनी रोखलं

रत्नागिरी: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बारसू येथील स्थानिकांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. रानतळे चेकपोस्टवर विनायक राऊत यांची गाडी अडवण्यात आली आहे. बारसू येथे कलम 144 लागू केलं असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे.तर यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, 'भूमीपुत्रांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर आम्ही याचा जाब विचारण्यासाठी सक्षम आहोत. 



काल रात्री 1. 30 वाजण्याच्या सुमारास पकडून नेण्यात आलेल्या महिलांना वाऱ्यावर सोडलं त्यांनी आवाज उठवला त्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळ सोडण्यात आलं' असं खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.विनायक राऊत यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. ते बारसू येथील स्थानिकांच्या भेटीला निघाले होते. हा विनायक राऊत यांचा मतदारसंघ आहे. बारसूमधील रिफायनरीच्या प्रकल्पावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारच्या भूमिकेवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच - राजन साळवी

राजन साळवी यांनी आज ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच....माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी राजन साळवी यांनी केली आहे. तसेच राजन साळवी यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे यांचे ट्विटवर अकाऊंट आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने