RSS चे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; 30 जणांची नावं केली जाहीर

दिल्ली: ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेनं  जम्मू-कश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, 'ग्रुपनं 30 आरएसएस नेते आणि कार्यकर्त्यांची यादी जारी केली आहे. द रेझिस्टन्स फ्रंट ग्रुपनं दावा केलाय, की ते जम्मू आणि कश्मीरमध्ये RSS कार्यकर्त्यांचे रक्त सांडतील.' जानेवारीमध्ये सरकारनं यूएपीए अंतर्गत टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय.



TRF चे लष्कर-ए-तौयबा (LeT) शी संबंध आहेत. ही दहशतवादी संघटना प्रामुख्यानं जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय आहे. दरम्यान, 1 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, स्वातंत्र्याच्या सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पाकिस्तानचे लोक नाखूष आहेत आणि त्यांना आता वाटतं की भारताची फाळणी ही चूक होती. ‘अखंड भारत’ हे खरं आहे, पण विभाजित हिंदुस्थान हे ‘दुःस्वप्न’ असल्याचंही ते म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने