हिंसाचार घडवून मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न - असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर  आणि MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पश्चिम बंगाल, बिहारमधील हिंसाचारानंतर ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांना लक्ष केलंय.दोन्ही नेत्यांनी सांगितलं की, 'रामनवमीच्या  मुहूर्तावर अशा घटनांमुळं राज्यातील सुरक्षा व्यवस्था बिघडवण्याचा हा डाव आहे, जो योग्य नाही.'मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हे युद्धाचं युग नाही. मात्र, आपल्या देशातच दोन राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारामागं समाजातील एक घटक आहे, जो याला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप त्यांनी केला.



त्याचवेळी एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही बिहार सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, जेव्हा-जेव्हा राज्यात हिंसाचार होतो, तेव्हा त्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. बिहार शरीफमध्ये मदरसा अजीझियाला आग लावण्यात आली. मुस्लिमांच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आलं, हे सर्व एका षड्यंत्राखाली घडलं, असा आरोप त्यांनी नितीश कुमार यांच्यावर केला.

'मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न'

ओवैसी पुढं म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना नालंदा हा संवेदनशील जिल्हा असल्याची माहिती होती, तरीही तिथं अशांतता होती. मुख्यमंत्री नितीश आणि तेजस्वी यांना राज्यातील मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करायची आहे. हे सरकार जाळपोळ आणि मशिदीवरील हल्ला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा मी निषेध करतो, अशी टीका त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने