अजित आगरकर बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता पदाच्या शर्यतीत! जाणून घ्या माजी अष्टपैलू खेळाडूची कारकीर्द

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) शुक्रवार आणि शनिवारी अनुक्रमे महिला संघाचा प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्षाचा निर्णय घेणार आहे. निवड समिती अध्यक्षपदासाठी माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर शर्यतीत असून, महिला संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार आणि तुषार आरोठे यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

क्रिकेट सल्लागार समितीने उमेदवारांना शुक्रवारी मुलाखतीसाठी बोलावले आहे. आरोठेने यापूर्वी एकदा महिला संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले असून, मुझुमदारकडे बडोदा संघटनेने प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली आहे. मुझुमदारने यापूर्वी ‘आयपीएल’मध्ये राजस्थान रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिका संघाचे साहाय्यक प्रशिक्षकपद भूषवले आहे. इंग्लंड कौंटीतील डरहॅम संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जॉन लुईस यांनीही या पदासाठी अर्ज केल्याचे समजते.



भारतीय पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदाची निवड शनिवारी होणे अपेक्षित आहे. चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. या पदासाठी शुक्रवापर्यंत अर्ज करण्याची मुदत असून, शनिवारी (१ जुलै) मुलाखती घेतल्या जातील असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

आगरकर अध्यक्ष झाल्यास निवड समितीत पश्चिम विभागाचे दोन सदस्य होतील. सध्या निवड समितीत पश्चिम विभागाकडून सलिल अंकोला आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अलीकडेच निवडक पदासाठी अर्ज मागवले होते, ज्याची अंतिम तारीख ३० जून आहे. यानंतर, क्रिकेट सल्लागार समिती (CAC) या पदासाठी काही नावांची निवड करेल आणि १ जुलै रोजी मुलाखत घेईल अशी अपेक्षा आहे. याआधी, भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागचे नाव या पदासाठी चर्चेत होते, परंतु खुद्द सेहवागने या पदासाठी अर्ज करण्यास मला सांगितले नसल्याने तो या शर्यतीत नाही त्यामुळे त्याने ही अटकळ फेटाळून लावली.

अजित आगरकर याची कारकीर्द अशी आहे…

अजित आगरकरच्या नावावर २६ कसोटी सामन्यात ५९ बळी आहेत. या खेळाडूच्या नावावर १९१ वनडेत २८८ विकेट्स आहेत. याशिवाय ४ टी२० सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या. तर अजित आगरकरने आयपीएलच्या ४२ सामन्यांमध्ये २९ फलंदाजांना बाद केले. दुसरीकडे, अजित आगरकरच्या कसोटी फॉरमॅटमध्ये फलंदाजीबद्दल बोलायचे तर या खेळाडूने १६.७९च्या सरासरीने ५७१ धावा केल्या. तर १९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १४.५९च्या सरासरीने १२६९ धावा जोडल्या. अजित आगरकर आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक संघाचा एक भाग आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने