“जय हरी विठ्ठल!” पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आषाढी एकादशीनिमित्त मराठीतून शुभेच्छा, ट्वीट करत म्हणाले…

अवघा महाराष्ट्र आज विठ्ठलाच्या भक्तीतन न्हाऊन निघाला आहे. पंढरपूरसह राज्यातील विविध ठिकाणी विठ्ठल मंदिरात भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देण्यासाठी ट्वीट केलं आहे. “सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल!” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट केलं आहे.
आज बकरी ईदही आहे. यानिमित्तानेही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-उल-अधाच्या शुभेच्छा. हा दिवस सर्वांना सुख-समृद्धी घेऊन येवो. तसेच आपल्या समाजात एकोप्याचा आणि सलोख्याचा भाव टिकून राहो. ईद मुबारक!” असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने