Amazon वर पडणार डिस्काउंटचा पाऊस, १५-१६ जुलैला प्राईम डे सेल, स्मार्टफोन्ससह लॅपटॉपवरही भन्नाट डिस्काउंट

नवी दिल्ली : Amazon Prime Day Date: अ‍ॅमेझॉन कंपनीने आयोजित केलेल्या खास अशा प्राइम डे सेलची तारीख आता जाहीर झाली आहे. Amazon प्राईम डे सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. तर या बहुप्रतिक्षीत प्राइम डे सेलला १५ जुलैपासून सुरूवात होणार आहे आणि १६ जुलैपर्यंत हा सेल चालणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, घरातील उपयोगी वस्तूंसह फर्निचर, कपडे, ब्युटी प्रोडक्ट्स अशा साऱ्यावर उत्तम डील्स उपलब्ध असतील.


Prime Day Sale मध्ये स्मार्टफोनवर खास ऑफर्स
Amazon India वर प्राइम डे सेलसाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. या मायक्रोसाइटवर सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन डिस्प्ले करण्यात आले आहेत. याशिवाय फोन आणि इतर उत्पादनांवर मिळणाऱ्या सवलतीच्या किमतीची माहिती लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Realme Narzo N53, OnePlus Nord CE 3 Lite 5G, OnePlus 11R 5G, iPhone 14 हे फोन्स उत्तम ऑफरसह विक्रीमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. याशिवाय प्राइम डे सेलमध्ये Dell Vostro 3420 लॅपटॉपही दमदार डिस्काउंटवर विकला जाऊ शकतो. याशिवाय, Asus TUF A15 गेमिंग लॅपटॉप, Xiaomi Pad 6 आणि LG UltraGear गेमिंग डिव्हाईसेसवरही सूट अपेक्षित आहे.
Amazon Prime Day 2023 मध्ये उपलब्ध आहेत खास ऑफर्स
प्राइम डे सेलमध्ये नव्याने लाँच केलेल्या उत्पादनांवरही उत्तम ऑफर्स दिल्या जातील. मोबाईल आणि अ‍ॅक्सेसरीजवर ४०% पर्यंत सूट असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अ‍ॅक्सेसरीजवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल, तर घरगुती आणि स्वयंपाकघरातील उत्पादनांवर ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. फॅशन आयटम म्हणजेच कपडे वैगेरेवर ८० टक्क्यांपर्यंत सूट असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने