महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर, एकूण ९३.८३ % विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी बातमीत पुढे दिलेल्या लिंकवरुन आणि खालील स्टेप्स फॉलो निकाल पाहू शकतात.

राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.




निकालाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात कोकण विभागाचा निकाल ९८.११ सर्वाधिक टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के जाहीर झाला आहे.

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,४९,६६६ निमित नोंदणी केली होती. त्यापैकी १५,२९,०९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,३४,८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ३०,००४ पुनर्परिक्षार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६,६४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी २२,३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णची ६०.९० आहे.

खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २१,२१६ २०५७४ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.२५ आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,३९७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३१२ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७,६८८ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.४९ आहे. इ.१० वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्याचा कोकण विभागाचा निकाल (१८.११%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९२.०५%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ असून मुलांच्या उत्तीर्णची टक्केवारी ९२.०५ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलापेक्षा

३.८२ ने जास्त आहे.

गुणपत्रिका १४ जून रोजी दुपारी ३ वाजता शाळेत मिळणार

एकूण ९३.८३ विद्यार्थी उत्तीर्ण

कोकण विभागाचा निकाल ९८.१८ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

दहावीच्या मार्च - एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने