टीम इंडिया दिसणार आता नव्या रूपात, तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या नवीन जर्सी लॉन्च

भारतीय संघ आता नव्या रूपात गिसणार आहे. टीम इंडीयाच्या नवीन किट प्रायोजक असलेल्या जगप्रख्यात कंपनीने नवीन जर्सी लाँच केली आहे. Adidas ने ICC टेस्ट चॅम्पियनशिपच्या आधी वेगळ्याच रूपात नव्या जर्सी सर्वांसमोर आणल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण गुरुवारी आदिदासने केले. आता या जर्सीत भारतीय खेळाडू मैदानात दिसणार आहेत. ही जर्सी भारतीय क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (ODI, T20 आणि टेस्ट) लाँच करण्यात आली आहे.

७ जूनपासून भारतीय संघ डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. सध्या खेळाडू सराव नवीन जर्सीमध्येच करत आहेत. गेल्या महिन्यातच बीसीसीआयने एडिडासशी २०२८ पर्यंतचा करार केला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर न्यू जर्सी येथील व्हिडिओ शेअर केला आहे.




Adidas ने लॉंच

BCCI ने २०२८ पर्यंत जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्सवेअर ब्रँड Adidas सोबत करार केला आहे. Adidas टीम इंडियाच्या जर्सीचे डिझाईन करणार आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आदिदासने डिझाईन केलेली नवीन जर्सी घालणार असल्याची अधिकृत माहिती बीसीसीआयने आधीच दिली होती. इतिहासात पहिल्यांदाच जर्सीला ३ पट्टे आहेत, ही देखील Adidas कंपनीची ओळख आहे.

तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळी जर्सी

आदिदासने टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळी जर्सी तयार केली आहे. टी-२०, वनडे आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळ्या डिझाईन केल्या आहेत. या जर्सीवरूनही आता संघ कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळत आहे हे ओळखता येईल.

वानखेडे स्टेडियममध्ये कार्यक्रम

आदिदासने टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळी जर्सी तयार केली आहे. टी-२०, वनडे आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळ्या डिझाईन केल्या आहेत. या जर्सीवरूनही आता संघ कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळत आहे हे ओळखता येईल.

वानखेडे स्टेडियममध्ये कार्यक्रम

वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटसाठी वेगवेगळ्या जर्सी आहेत. पण यातील टी-२० संघाची जर्सी ही कॉलर लेस असणार आहे. त्याचसोबत जर्सीवर एक वेगळा डिझाईनचा टेक्स्चरही देण्यात आला आहे. तिन्ही जर्सीमधील एकसारखेपणा म्हणजे या तिन्ही जर्सीच्या खांद्यावर तीन पट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. या आदिदास कंपनीची ओळख सांगतात.

७ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आता संपूर्ण भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. ७ जूनपासून टीम इंडिया आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये संघ नवीन जर्सी घालणार आहे.

नवीन प्रशिक्षण किट

टीम इंडियाही नव्या ट्रेनिंग किटमध्ये सराव करत आहे. कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी खेळाडू इंग्लंडमध्ये आल्यानंतर नवीन प्रशिक्षण किट लाँच करण्यात आली. इंग्लंडमधील वातावरण पाहून हे नवीन किट डिझाईन करण्यात आले असून या किटच्या हातांवर त्या काळ्या पट्ट्या देण्यात आल्या आहेत, जी पुन्हा एकदा आदिदास कंपनीच्या लोगोशी मेळ घालणारे आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने