पती पत्नीच्या या सवयी उद्ध्वस्त करेल संसार, चाणक्य नीती काय सांगते

प्रसिद्ध अर्थशास्त्री आचार्य चाणक्य हे अत्यंत बुद्धीमान आणि कुशल राजनीतिज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या हुशारीने केवळ यश मिळवलं नाही तर समाजाचे कल्याणही केले आहे. त्यांची रणनीती हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. खासगी आयुष्य, नोकरी, व्यापार, नाती, मित्रता आणि शत्रुत्व या सर्व विषयावर चाणक्यांचे वेगवेगळे विचार आणि त्यावरील उपायही अत्यंत फायदेशीर ठरतात.

पती - पत्नीच्या नात्याविषयी तर सर्वांनाच माहीत आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी बऱ्याच जणांची परिस्थिती आहे. मात्र पती - पत्नीने आपलं नातं जपण्यासाठी अशा काही सवयी आहेत ज्या सोडायला हव्यात असं चाणक्य नीती सांगते. या नक्की कोणत्या सवयी आहेत, त्या जाणून घ्या.




रागराग करणे

चाणक्य नीतीनुसार, राग हा प्रत्येक गोष्टीसाठी वाईटच ठरतो. पती आणि पत्नीच्या नात्यात राग हा अत्यंत नुकसानदायी ठरतो. पती अथवा पत्नी दोघांपैकी कोणीही रागात असेल तर काय चांगले अथवा काय वाईट, कोणती गोष्ट योग्य वा अयोग्य याचा सारासार विचार करण्यात येत नाही.

त्यामुळे वैवाहिक आयुष्यात लहान-सहान गोष्टी कधी मोठ्या भांडणात बदलतात आणि कधी नातं तुटण्याची वेळ येते हे कळतही नाही. त्यामुळे रागात कोणतेही निर्णय न घेणे योग्य.

एकमेकांना आदर न देणे

प्रत्येक नात्यात सन्मान करणं अर्थात नात्याला आदर देणे अत्यंत आवश्यक आहे. चाणक्य नीतीनुसार, पती आणि पत्नीचे नाते हे एकमेकांशिवाय अपूर्ण असते.

नात्यात नोकझोक असायला हवी मात्र त्याबरोबर आदरही असायला हवा. हे नातं जपण्यासाठी नात्यात आदर असणे आवश्यक आहे. असं न झाल्यास वैवाहिक जीवन खराब होण्यास वेळ लागत नाही.

बोलणे बंद होणे

पती पत्नी हे एकमेकांच्या सुखदुःखातील जोडीदार असतात आणि त्यामुळे या गोष्टींचा व्यवस्थित समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी एकमेकांशी बोलणे आणि आपल्या मनातील सल सांगणे अथवा ऐकणे हे गरजेचे आहे.

दोघांबाबत कोणतीही गोष्ट खटकत असेल तर ती बोलून सोडवता आली पाहिजे. बोलणंच बंद झालं तर गैरसमज वाढतील आणि त्यानंतर येणारा दुरावा आणि कलह कोणीही सोडवू शकत नाही. यामुळे हळूहळू नातं संपत जाईल हे लक्षात घ्या.

सत्य लपवणे

पती आणि पत्नीचे नाते हे इतके नाजूक असते की कोणत्याही गोष्ट लपवल्या आणि विश्वासघात झाला तर ते नाते पुन्हा जुळणे कठीण आहे. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी एकमेकांवर अत्यंत विश्वास असणे आवश्यक आहे.

एकदा नात्यात कडवटपणा आला आणि विश्वास गेला की तो पुन्हा मिळवणं कठीण आहे. त्यामुळे सत्य न लपवणं अधिक चांगलं. नात्यात खोटं बोलल्यास, ते जास्त काळ टिकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने