रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अननस ठरतंय वरदान, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!

अननस हे एक उत्तम उन्हाळी फळ असून केवळ स्वादिष्ट आणि रसाळ नसून, व्यायामापूर्वी आणि नंतरचा नाश्ता म्हणून उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात अननस खाल्ल्याने शरीरातील फॅट्स आणि प्रोटिन्स सहजपणे पचवले जातात. तसेच शरीरातील उष्णतेला नियंत्रित ठेवण्यास देखील अननसामुळे मदत होते. अननसाच्या आंबटगोड चवीमुळे जिभेचे चोचले देखील पूर्ण होतात. याव्यतिरिक्त रक्तातील साखरेचे प्रमाण आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या मुबलकतेमुळे, अननस हा एक योग्य प्री-वर्कआउट स्नॅक देखील मानला जातो जो स्नायूंचे कार्य सुधारतो. मात्र मधुमेहींनी अननस किंवा अननसाचा ज्यूस टाळावा कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते.

मधुमेह असलेले बरेच लोक फळे टाळतात, कारण त्यांना असं वाटतं की, फळांमधील गोडपणामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की फळांमधील गोडपणा प्रामुख्याने नैसर्गिक असतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना याचा काहीही त्रास होत नाही. हे फळ फायबर, मायक्रोन्युट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहेत, हे सर्व मधुमेह रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. अननसात फायबरचे प्रमाण जास्त असते, एक कप ताजे अननस २.२ ग्रॅम असून रक्तप्रवाहात रक्तातील साखरेचे उत्सर्जन कमी करते. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते.




अनेकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे अननसमध्ये व्हिटॅमिन बी 6 भरपूर असते, जे लाल रक्तपेशी आणि मॅंगनीज तयार होण्यास मदत करते. तसेच चरबी आणि कर्बोदकांमधे चयापचय नियंत्रित करणारे एक महत्त्वपूर्ण सूक्ष्म पोषक घटक या फळामध्ये आहे .

पचनसंस्था सुरळीत करते –

उन्हाळ्यात अनेकदा पचनसंस्था नीट काम करत नाही. गॅस अॅसिडिटी, डायरिया, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात अननसाचा ज्यूस प्या, पोट चांगले स्वच्छ होईल आणि ताजेपणा राहील. वास्तविक, या रसातील एन्झाईम्स तुमच्या आतड्यातील प्रथिने तोडण्याचे काम करतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात.

हाडे मजबूत –

हाडांच्या मजबुतीसाठी तुम्ही अननसाचा रस देखील पिऊ शकता. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅंगनीज असल्याने दात आणि हाडे मजबूत होतात.

हृदयविकारात फायदेशीर –

अननसमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी असते, जे हृदयरोगापासून तुमचे संरक्षण करते, जे लोक हाय बीपीच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी त्यांच्या आहारात अननसाचा समावेश जरूर करावा. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर –

अननसाचा रस डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होतात. त्याचा रस लहान मुलाला सुरुवातीपासूनच द्यावा, म्हणजे लहान वयातच त्याची दृष्टी कमजोर होणार नाही.

त्वचेसाठी महत्त्वाचे –

अननस खाणे किंवा त्याचा रस पिणे त्वचेशी संबंधित समस्यांमध्येही फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे मुरुमांबरोबरच चट्टेही कमी होतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा सुधारण्यास मदत करते, त्वचेतील मृत त्वचा काढून टाकून त्वचा सुधारते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने