पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या जीन्स पँटचा खिसा छोटा का असतो? कारण वाचून व्हाल थक्क

ऑफिसपासून ते बाहेर कुठेही जायचे असल्यास अनेकांचा कंफर्ट ज्या कपड्यात बसतो तो म्हणजे जीन्स. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वजण जीन्स पॅन्ट घातलेले दिसतात. पण तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की महिलांच्या जीन्स पँटचे खिसे पुरुषांच्या तुलनेत लहान का असतात. खरंतर यामागे एक मोठं रहस्य आहे, ते जाणून तुम्हाला धक्का बसेल. चला तर यामागे नेमकं काय सीक्रेट आहे ते आज आपण जाणून घेऊया.



जींन्सचं स्ट्रक्चर
गारमेंट तज्ञांच्या मते, बहुतेक जीन्स मध्ये लाइक्रा स्ट्रेच नावाचे फॅब्रिक असते. अशात या पँटला खिसा बनवल्या गेल्यास पँट स्ट्रेच होतो ज्यामुळे पँट फाटण्याची शक्यता वाढते. महिलांच्या पँटचे खिसे छोटे असण्यामागे हे एक मोठं कारण असू शकतं.
शरीराचा आकार
बहुतेक स्त्रियांची कंबर वक्र आणि लहान असते. अशा परिस्थितीत महिलांची शरीरयष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्या जीन्स पँटचा खिसा छोटा ठेवला जातो. जेव्हा पँटचा खिसा लांब असतो तेव्हा त्यात लेयर्स दिसतात, ज्यामुळे तुमची फिगर ओबड धोबड दिसण्याची शक्यता असते. म्हणूनच अनेक कंपन्या जीन्स पँटमध्ये लहान खिसे बनवल्या जातात.
स्वस्त जीन्स
गारमेंट उद्योगाशी संबंधित लोकांच्या मते, महिलांच्या जीन्स पँटमध्ये खिसा लहान असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे असे केल्याने खर्च वाढतो. खरे तर खिसा मोठा करण्यापेक्षा मोठे कापड त्यासाठी वापरावे लागते. तर एक छोटासा खिसा लावून त्या कापडाची बचत होते. त्यामुळेच बहुतांश कंपन्या खर्च कमी करण्यासाठी छोटे खिसे टाकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने