Periods मध्ये निवांत झोपायचं असेल तर या गोष्टींची लावा सवय

महिलांसाठी मासिक पाळीचे ५-७ दिवस अत्यंत कठिण असतात. मासिक पाळीतील प्रत्येक महिलेच्या समस्या या वेगवेगळ्या असतात. मासिक पाळीचे दिवस हे अत्यंत अवघडल्या सारखे असतात. अनेकदा अशक्तपणा आणि वेदना सोबतच ब्लड फ्लोमुळे दिवसा कसा पार पडतोय असं वाटतं. 

तर दुसरीकडे रात्री नीट झोप लागत नाही. मासिक पाळीमध्ये अनेकदा पाठदुखी, कंबर दुखी किंवा लिकेजच्या चिंतेमुळे महिलांना झोप लागत नाही. तसंच मासिक पाळीमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचा स्तर सतत बदलत असल्याने देखील महिलांना झोप लागत नाही.




एकीकडे वेदना सोसत दिवसभर काम करणं तर दुसरीकडे अपुरी झोप यामुळे महिलांना अधिक थकवा येतो किंवा आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होवू शकतात. मासिक पाळीमध्ये पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठीच काही टिप्स वापरून मासिक पाळीत शांत झोप घेणं शक्य आहे. 

झोपण्यासाठी अनुकूल वातावरण बनवा- जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये शांत झोप हवी असेल तर त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणं अधिक गरजेचं आहे. खोलीच्या खिडक्या दारं बंद करा जेणेकरून बाहेरील आवाज येणार नाही. 

तुमच्या आवडीचं एखादं शांत म्युझिक तुम्ही ऐकू शकता. यामुळे वेदना कमी जाणवतील आणि झोप येण्यास मदत होईल. खास करून झोपण्यापूर्वी सोशल मीडियाचा वापर करू नका. झोपताना एक ग्लास जायफळच्या दुधाचं सेवन केल्यासही झोप येण्यास मदत होईल. 

वेदना कमी होण्यासाठी गरम शेक- जर तुम्हाला प्रचंड वेदनांमुळे झोप येत नसेल. तसचं पाठदुखी किंवा कंबरदुखीमुळे झोप लागण्यास त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा किंवा गरम पाण्याच्या पिशवीने तुम्ही पाठ तसचं कंबरेला शेक देऊ शकता. यामुळे आराम मिळेल आणि शांत झोप लागेल. 

औषधं आणि घरगुती उपाय- जर गरम पाण्याच्या शेकाने देखील वेदना होत असतील तर तुम्ही मेडिकलमधून काही औषधं आणून ती घेऊ शकता. यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

तसचं तुम्ही दालचिनी चहा किंवा तुळशीच्या चहाचं सेवन करू शकता. यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी होण्यास मदत होते. 

या उपायांसोबतच लिकेज होणार नाही यासाठी चांगल्या दर्जाचे पॅड, टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कपचा वापर करा. या सोबतच झोपताना खबरदारी म्हणून तुम्ही मासिक पाळीसाठी एखादी जुनी चादर अंथरु शकता. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने