रात्री जेवल्यानंतर चालण्याची योग्य पद्धत कोणती? जेवणानंतर ३० मिनिटं थांबवं की नाही?

आपल्याला भूख लागल्यानंतर रात्रीच्या वेळी आपण खूप जास्त जेवतो किंवा कमी प्रमाणात अन्न ग्रहण करतो. त्यानंतर शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी शरीरात रक्त प्रवाह योग्य पद्धतीने सुरु राहावं लागतं. जर यात काही अडचण निर्माण झाली तर आरोग्यविषयक समस्यांना समोरं जावं लागू शकतं. जर तुमच्या शरीरात पचनक्रिया व्यवस्थित झाली नाही, तर तुम्हाला असिडीटी, पोटातील वात, बद्धकोष्ठता, लठ्ठपणासारख्या आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. पंरतु, तुम्हाला शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर योग्य पद्धतीने चालणे आवश्यकअसते. जाणून घेऊयात डॉ. मिकी मेहता यांनी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.

चालण्यामुळे शरीरातील पचनक्रिया चांगली राहते. स्पोर्ट्स मेडिसीनने केलेल्या स्टडीनुसार, जेव्हा माणसं रात्रीच्या जेवणानंतर चालायला जातात, त्यावेळी त्यांची ब्लड शुगर लेव्हल हळूहळू वाढते आणि इन्सूलिनचं प्रमाण स्थिर राहतं. काही तज्ज्ञ सांगतात, रात्रीच्या जेवणानंतर चालल्यावर ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन चालल्यावरही शरीराला फायदा होतो. तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. जेवणानंतर ३० मिनिटे चालल्यावर १५० कॅलरी बर्न होऊ शकतात.




जेवण झाल्यावर किती वेळानंतर चालावं?

जेवणानंतर ३० मिनिटं झाल्यावर चालणे योग्य आहे, असं अनेक स्टडीमध्ये म्हटलं आहे. पण वेदिक विस्डमच्या माहितीनुसार, जेवणानंतर मोठी गॅप ठेवल्यानंतर चालायला गेल्यास जास्त फायदा होतो. आरामात श्वास घेऊन हळूहळू चालल्यावर पचनक्रिया सुधारते.

जेवणानंतर चहा पिणे योग्य?

जेवण झाल्यानंतर एक तासाच्या कालावधीनंतर कॅमोमाईल चहा पिऊ शकता. या चहामध्ये आले, पुदीना, जायफळ आणि थोडंसं गुळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमची चालण्याची शक्ती अधिक वाढेल.

थोड्यावेळासाठी वज्रासन करा

डोळे बंद करून नाक आणि तोंडाद्वारे हळूवारपणे ब्रिदिंग करा. याचा फायदा तुम्हाला फूड वॉक करण्यासाठी होतो. श्वास सोडताना शरीर हलक्या स्वरुपात ठेवा, ज्याामुळे तुम्हाला पचक्रिया व्यवस्थित होण्यास फायदा होईल.

हळू चालण्याचा सराव करा

हळू चालल्यावर शरीर आणि मनं स्थिर राहतं. तुमचं मानसिक आरोग्यही उत्तम राहण्यास मदत मिळते. कार्यलयात किंवा घरच्या कामाचा ताणतणाव कमी करण्यासही मदत होते. तु्म्ही अतिविचार करत असाल, तर अशा चालण्याने तुमचा मेंदू सक्रीय राहू शकतो. हळू चालल्याने तुम्हाला चांगली झोप लागते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने