हे पदार्थ देतील इतकं Vitamin D की पडणारच नाही सुर्यप्रकाशाची गरज, पूर्ण 206 हाडे बनतील आतून ठोस

Vitamin D मिळवण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक मानला जातो. पण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सूर्याचे नीट दर्शनच होत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचा धोका वाढतो. त्यामुळे कॅल्शियमही विरघळत नाही आणि हाडे कमकुवत होऊ लागतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत तर? वारंवार आजारपण येणे, थकवा आणि अशक्तपणाजाणवणे, पाठदुखी, हाडे दुखणे, वारंवार हाडे फ्रॅक्चर होणे, नैराश्य येणे, जखम बरी होण्यास उशीर लागणे, हाडे ठिसूळ होणे, केस गळणे, वजन वाढणे, स्नायू दुखणे, चिंता सतावणे इत्यादी त्रास सुरू होतात.

पण मंडळी, तुम्हाला माहित आहे का सूर्यप्रकाशाशिवायही या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढता येते. व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन तुम्ही यासाठी करायला हवे. समावेश होतो. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे लोक या पदार्थांचे सेवन करून कमतरता भरून काढू शकतात.




संत्री ज्यूस

संत्री फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. काही फोर्टिफाइड संत्र्याचे रस बाजारात उपलब्ध आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन डी आढळते. हे प्यायल्याने तुम्ही रोजची व्हिटॅमिन डी ची गरज पूर्ण करू शकता आणि हाडे मजबूत करू शकता.

दूध

एक ग्लास दूध पिऊन तुम्ही हाडे आतून मजबूत करू शकता. हे नैसर्गिक पेय व्हिटॅमिन डी सोबत कॅल्शियम पुरवते. USDA च्या अहवालानुसार, 100 mL दूध 51 IU व्हिटॅमिन D आणि 113 mg कॅल्शियम प्रदान करते.

ऑयस्टर

बहुतेक लोकांना माहित आहे की मासे खाल्ल्याने त्यातून व्हिटॅमिन डी मिळते. पण ऑयस्टर हे असे एक सीफूड आहे जे हे पोषक तत्व मुबलक प्रमाणात पुरवते. हे फूड खाल्ल्याने व्हिटॅमिन बी12 ची कमतरता देखील दूर होऊ शकते.

अंडी

प्रथिनांनी समृद्ध असलेली अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अंडे हे ऑस्टियोपोरोसिसच्या आजारापासून बचाव करते आणि व्हिटॅमिन डी देते. यासाठी अंड्याचा पिवळा भाग खावा. कारण, पांढऱ्या भागात फक्त प्रोटीन असते.

मशरूम

मशरूम हे शाकाहारी लोकांसाठी मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी देणारे फूड आहे. पण लक्षात ठेवा की फक्त तेच मशरूम व्हिटॅमिन डी देऊ शकतात, जे सूर्यप्रकाशात वाढले आहेत. म्हणूनच बाजारातून खरेदी करताना, त्याच्या पॅकेजिंगवर व्हिटॅमिन डी चा उल्लेख आहे की नाही ते निश्चितपणे तपासा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने