काळेभोर, लांबसडक केसांसाठी करा हा आयुर्वेद उपाय, केसगळतीची समस्या होईल लगेचच दूर

केसगळती, केसांचे तुटणे, अकाली केस पांढरे होणे या समस्यांमुळे हल्ली बहुतांश जण हैराण झाले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे वाढते प्रदूषण, धूळ आणि आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा अभाव हे आहेत.

पण योग्य औषधोपचार करून केसांची काळजी घेतली तर या सर्व समस्या नक्कीच कमी होऊ शकतात. या लेखाद्वारे आपण एक आयुर्वेदिक हेअर मास्क तयार करण्याची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे केसगळती, कोंडा, कोरड्या केसांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. चला तर जाणून घेऊया शिकेकाई  हेअर मास्क कसे तयार करायचे?




शिकेकाई हेअर मास्क तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

  • शिकेकाई पावडर 
  • आवळा पावडर 
  • रीठा पावडर 
  • अंडे - दोन
  • लिंबू रस - दोन ते तीन चमचे
  • कोमट पाणी आवश्यकतेनुसार 
  • वरील सर्व साम्रगी बाऊलमध्ये घेऊन नीट मिक्स करा.   
  • यानंतर हे मास्क केसांवर लावा. 
  • 30 मिनिटांनंतर केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्यावेत 
  • यानंतर केसांना कंडिशनर देखील लावा.

यामुळे केस अधिक मजबूत आणि घनदाट होतील. सोबत केसगळतीची समस्याही दूर होईल. दुभंगलेल्या केसांच्या समस्येपासूनही सुटका होईल. शिकेकाईमध्ये अँटी- फंगल गुणधर्म आहेत, ज्यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.   

शिकेकाईमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन  K आणि व्हिटॅमिन  D यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. ज्यामुळे केस मुळासकट मजबूत होतात. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने