युरोपियन कंपनी, दोनदा दिवाळखोर, भारतात येऊन झाली लोकप्रिय; मोच्याच्या मुलाने उभी केली फूटवेअरची चेन

नवी दिल्ली : "अनेक जण अंथरुणावरच प्राण त्यागात कारण ते चालणं बंद करतात. जर तुम्ही थांबला तर तो तुमचा शेवटचा क्षण असं समजा. जर तुम्ही तुमचा वेग कमी केला तर तुम्ही अर्धमेले आहात. जीवन हे पुढे जात जाण्याचे नवा आहे." या ओली कोणत्याही तत्त्ववेत्त्याच्या नाहीत, तर एका व्यावसायिकाच्या आहेत, ज्याने भारतीयांना चप्पल आणि शूजचा अर्थ समजावून सांगितला. ज्याने सांगितले की चालायचे असेल तर अनवाणी चालू नका, चप्पल घालून अभिमानाने चाला. ज्याने सांगितले की व्यवसाय थांबला तरी ध्येय सोडू नका. दुप्पट मेहनत करा, लोकांना तुमच्याशी जोडा आणि तुम्ही जगाचा ताबा घ्याल."

थॉमस बाटा असे या व्यावसायिकाचे नाव होते, ज्यांचा फूटवेअर ब्रँड, बाटा अनेक दशकांपासून जग आणि भारतीय बाजारात एकहाती राज्य करत आहे. भारतात शूज किंवा चप्पल म्हटले की बहुतेकांच्या मनात बाटा हे पहिले नाव येते. दरम्यान, आजही बहुतेक भारतीयांना वाटते की बाटा एक देशी ब्रँड आहे, पण या कंपनीच्या भरतील यशाची कहाणी युरोपातील चेकोस्लोव्हाकिया (झेक प्रजासत्ताक) येथून झाली.




कोण होते थॉमस बाटा

झेक प्रजासत्ताक येथील झ्लिन येथे राहणारे एक कुटुंब अनेक पिढ्या शूज बनवायचे. या घराण्यात थॉमस बाटा यांचा जन्म झाला. आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी थॉमसने एक योजना बनवली. सर्वप्रथम त्यांनी गावात दोन खोल्या भाड्याने घेतल्या. मोठ्या प्रमाणावर शूज बनणवण्याचे स्वप्न उराशी बाळगून थॉमस यांनी काम सुरू केले. आई, बहीण आणि भाऊ (ॲना आणि अँटोनिन) व्यापारात त्यांचे भागीदार बनले. आईकडून ३२० डॉलर घेऊन त्यांनी कच्चा माल खरेदी केला. तब्बल शेकडो वर्ष जुन्या या कंपनीने अनेक अडथळे पार केले आहेत पण आजही तिची ओळख भारतीयांमध्ये कायम आहे.

भाऊ-बहिणीने साथ सोडली

थॉमस यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा सुरुवातीला जेव्हा अडचणी आल्या तेव्हा भाऊ आणि बहिणीने साथ सोडली, पण थॉमस यांनी हार मानली नाही. सततच्या संघर्षानंतर एक दिवस त्यांना यश मिळाले. हे पाहून त्यांनी कर्ज घेऊन व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला, पण नंतर परिस्थिती बिकट होऊन व्यवसाय ठप्प झाला. कर्ज फेडता न आल्याने परिस्थिती हलाखीची झाली, परिणामी कंपनीला दिवाळखोरी जाहीर करावे लागले.

कंपनी दिवाळखोर झाली अन् शूज कंपनीत मजुरी केली

कंपनी दिवाळखोर घोषित झाल्यानंतर थॉमस इंग्लंडला आले आणि एका शू कंपनीत मजूर म्हणून काम करू लागले. तिथे काम करताना त्यांना चपलांच्या व्यवसायातील बारकावे समजले. सहा महिने काम केल्यानंतर ते आपल्या देशात परतले आणि नव्याने व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

पुन्हा कंपनी सुरू केल्यावर व्यवसायाचा वेग वाढला. १९१२ मध्ये व्यवसाय इतका वाढला की थॉमस यांनी ६०० कामगारांची भरती केली. मजबूत, आरामदायी आणि टिकाऊ असल्यामुळे बाजारात बुटांची मागणी वाढू लागली. आपल्या उत्पन्नाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी थॉमस यांनी शहरांमध्ये कंपनीची दुकाने उघडली. पहिल्या महायुद्धात मंदी आली ज्यामुळे उत्पादनावर वाईट परिणाम झाला. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी थॉमसने बुटांच्या किमती ५०% कमी केल्या, ज्याचा परिणाम दिसून आला आणि किंमत कमी केल्यानंतर उत्पादनात १५ पट वाढ झाली. याचा फायदा घेत थॉमस यांनी व्यवसाय वाढण्यासाठी इतर देशांमध्ये आपला ब्रँड सुरू केला. १९२५ पर्यंत बाटाच्या जगभरात १२२ शाखा उघडल्या तर आता बाटा बुटांसह मोजे आणि टायर बनव असून काही वेळातच एका छोट्याशा कंपनीचे रूपांतर बाटा समूहात झाले आहे.

वडिलांच्या निधनानंतर मुलाच्या हाती व्यवसायाची धुरा

एका विमान अपघातात थॉमस यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. ते चांगले चामडे आणि रबरच्या शोधात भारतात आले. इथे बहुतांश लोकांना त्यांनी अनवाणी (चपलेशिवाय) चालताना पहिले आणि भारतात बाटाचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी विचार केला.

भारतात बाटाची सुरूवात

भारतात कोलकाता येथील एका छोट्या गावातून बाटा कंपनीची सुरुवात झाली. जेव्हा बाटाच्या पादत्राणांची मागणी वाढू लागली तेव्हा त्यांनी उत्पादन दुप्पट केले आणि काही काळातच कंपनीने दर आठवड्याला सुमारे ४००० शूज विकायला सुरुवात केली. भारतात चार हजार कर्मचारी असलेल्या कंपनीने टेनिस शूज डिझाइन करण्यास सुरुवात केली, असे करणारी ही कंपनी पहिली कंपनी ठरली.

उल्लेखनीय आहे की अशीही वेळ आली जेव्हा बाटाला पॅरागॉनकडूनही स्पर्धा मिळाली. तेव्हा बाटाने एक मोहीम राबविली, ज्यात टिटनेस टाळण्यासाठी शूज घालण्याचे आवाहन करण्यात आले ज्यामुळे कंपनीची विक्री वाढली. दुसरीकडे, बाटा कंपनीत सध्या आठ हजारांहून अधिक कर्मचारी करारात असून जगातील ९० देशांमध्ये व्यवसाय पसरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने