हाडांच्या मजबूतीसाठी रात्री झोपताना करा असे काम, दुधात मिक्स करा असा पदार्थ की मिळतील ५ फायदे

अधिक चांगले आणि निरोगी आरोग्य मिळवून देण्यासाठी आपण वेगवेगळ्या अन्नाचे सेवन करत असतो. यासाठी विटामिन्स, पोषक तत्वांनी युक्त अशा भाज्या, ताजी फळं, ड्रायफ्रूट्स इत्यादीचे सेवनही केले जाते. सतत बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचाही तरूण पिढीलाही सामना करावा लागतो.

तरूण वयातच हाडं ठिसूळ व्हायला लागली असतील तर २०६ हाडांच्या मजबूतीसाठी तुम्ही एका रामबाण घरगुती उपचाराचा तुम्ही आधार घेऊ शकता. शरीर अधिक तंदुरूस्त होण्यासाठी दुधात हळद मिक्स करून पिण्याचे फायदे तर तुम्हाला माहीत आहेतच. पण याप्रमाणेच दुधात तूप मिक्स करून शरीराला अनेक फायदे मिळतात. दुधात तूप मिक्स करून नियमित प्यायल्यामुळे हाडांची मजबूतीसह अनेक फायदे मिळतात.



पचनशक्तीमध्ये होते सुधारणा
रिसर्चगेटमध्ये दिलेल्या एका वृत्तानुसार, रोज दुधात एक चमचा तूप मिक्स करून प्यायल्यामुळे पचनशक्तीला फायदा मिळतो. ज्यांना बद्धकोष्ठता अथवा गॅससारख्या समस्या असतील त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. तसंच पचनशक्ती सुधारल्यामुळे वजन कमी करण्यासाठीही याचा फायदा मिळतो. ज्या व्यक्तींना अपचनाची समस्या आहे अथवा बद्धकोष्ठतेने हैराण झाले आहेत, त्यांनी पोट स्वच्छ होण्यासाठी याचे सेवन करावे.

प्रतिकारशक्ती बुस्ट करण्यासाठी
सध्या अनेकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आजारपणाला निमंत्रण मिळते आहे. मात्र दुधात रोज रात्री झोपण्यापूर्वी नियमित तुम्ही तूप घालून पिण्यामुळे शरीरातील रोगप्रतिरोधक क्षमता वाढण्यास मदत मिळते. यामुळे अनेक आजार दूर राहून रूग्णांना प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत मिळते. याशिवाय आतड्यांनाही फायदा मिळतो.

सांधेदुखीपासून सुटका
हल्ली तरूण वयातही न चालल्यामुळे अथवा व्यायामाच्या कमतरतेमुळे सांधेदुखीची समस्या लवकर सुरू झालेली दिसून येते. युरिक अ‍ॅसिडची वाढ हेदेखील यामागील कारण ठरते. मात्र दुधामध्ये नियमित तूप मिक्स करून सेवन केल्यास, सांधेदुखीपासून सुटका मिळते. दुधामध्ये असणारे कॅल्शियम, ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिड हे सांधेदुखीपासून सुटका मिळवून देतात आणि त्रास कमी होतो.

हाडांमध्ये मजबूती मिळते
दुधात देशी तूप मिक्स केल्याने शरीरातील शक्ती वाढून हाडांना बळकटी मिळते. थकव्यापासून तुम्ही दूर राहाता आणि मांसपेशी अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. रोज दुधात तूप मिक्स करून पिण्याने २०६ हाडांना योग्य कॅल्शियम मिळून हाडं मजबूत होतात आणि हाडांमध्ये त्रास दिसून येत नाही.

गरोदर महिलांनाही मिळतो फायदा
ज्या महिला गरोदर आहेत, त्यांनीही रोज दुधात तूप मिक्स करून न चुकता प्यावे. यामुळे कॅल्शियम तर मिळतेच. याशिवाय बाळाचा चांगला विकास होण्यास मदत मिळते. गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा अनेक जणींना त्रास होतो दूध-तुपाच्या सेवनाने हा त्रास कमी होतो. मात्र याच्या सेवनापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने