वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा! 'या' खेळाडूचे खेळण्याचे स्वप्न भंगले

आता एकदिवसीय वर्ल्डकप सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे, याआधी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाची धुरा रोहित शर्माकडे आहे. ही स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.

एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांचा फलंदाज म्हणून समावेश केला आहे. लोकेश राहुल आणि इशान किशन यांचा संघात 2 यष्टीरक्षक म्हणून संघात आहे. रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या खांद्यावर असणार आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवाचा संघात समावेश केला आहे.




आशिया कप मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर श्रीलंकेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची बैठक झाली, ज्यामध्ये वर्ल्ड कप खेळण्यासाठी 15 खेळाडूंना अंतिम रूप देण्यात आले.

आशिया कप मध्ये भारतीय संघात स्थान मिळालेले प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा आणि राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या संजू सॅमसनला संघात स्थान मिळणार नाही.

वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

टीम इंडिया वर्ल्ड कप वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला

  • 29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ

  • 2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई

  • 5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने