भारतातल्या ६९ लाख महिलांना कॅन्सरपासून वाचवता आलं असतं; जाणून घ्या नक्की कुठे बिनसलं?

भारतामध्ये कॅन्सरमुळे अकस्मात मृत्यू होणाऱ्या ६३ टक्के महिलांना योग्य तपासणी आणि धोका कमी करून वाचवता येऊ शकलं असतं.. तर ३७ टक्के महिलांना योग्य वेळी उपचार दिल्याने त्या वाचू शकतात. ही माहिती लॅन्सेट कमिशनच्या नव्या अहवालातून समोर आली आहे. या अहवालाचं शीर्षक आहे - वुमन, पॉवर अॅन्ड कॅन्सर.

या अहवालात म्हटलं आहे की, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या जवळपास ६९ लाख महिलांचा जीव वाचवता आला असता. तर ४ मिलियनहून अधिक महिलांवर उपचार करता आला असता. या अहवालात असंही म्हटलं आहे की पुरुषांना कॅन्सरचा धोका जास्त असतो, पण कॅन्सरचा स्त्रियांवरही गंभीर परिणाम होतो. पण महिलांमध्ये कॅन्सरचे रुग्ण आणि मृत्यूदर जास्त आहे.




जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक स्तरावर महिलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण ४८ टक्के आहे तर कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण ४४ टक्के आहे. पण हे प्रमाण तेव्हाचं आहे ज्यावेळी फक्त महिलांना होणारे कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा आणि स्तनाचा कॅन्सर योग्य उपचाराने बरा होऊ शकतो, अशा पातळीवर असतो.

संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या १५ लाखांहूनही अधिक होण्याचा अंदाज आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार, हे लक्षात येतं की प्रति लाख लोकसंख्येमागे ९४.१ पुरुष आणि १०३.६ महिलांना कॅन्सर होतो. पुरुषांना तोंडाचा, फुफ्फुसाचा, जीभ आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. तर महिलांमध्ये स्तन, गर्भाशयाच्या मुखाचा, गर्भाशयाचा, अंडाशयाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असल्याचं आढळून आलं आहे.

महिलांची अशी परिस्थिती का आहे?

महिलांच्या या परिस्थितीमागे अनेक कारणं आहेत. म्हणजे महिलांना याबद्दल जास्त माहिती नसणे, त्यांच्याकडे निर्णयक्षमता आणि पैसे नसणे. याशिवाय घराच्या आसपास प्राथमिक स्तरावर आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांना वेळेवर उपचार आणि योग्य देखभालही मिळत नाही. तसंच या अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की जेव्हा कॅन्सरचे उपचार किंवा देखभालीची सुविधा पुरवण्यामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व कमी आहे. त्यामुळे त्यांना लिंग-आधारित भेदभाव आणि लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने