या भांड्यांमध्ये जेवण शिजवल्यास Liver होतो कायमचा फेल, उद्भवते दारूपेक्षा भयंकर स्थिती, या 8 सवयी बदलून वाचवा जीव

Liver अर्थात यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे, ज्यामुळे शरीर आतून स्वच्छ राहते. विविध कारणांमुळे शरीरात केमिकल्स वाढतात, जी दूर करण्याचे काम लिव्हर करते. पित्त, HDL Cholesterol अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचे उत्पादनही हा अवयव हाताळतो. जेव्हा लिव्हर खराब होते तेव्हा शरीराची स्वच्छता थांबते. त्यामुळे आरोग्य आणि आयुष्य बिघडू लागते. यकृताच्या आजाराची लक्षणे खूप नंतर दिसतात.

उशीर झाल्यामुळे त्यात कावीळ, पोटदुखी, पोटात सूज, खाज, गडद रंगाची लघवी, सतत थकवा, भूक न लागणे आणि उलट्या यांचा समावेश असू शकतो. आजही जनमानसात लिव्हरच्या आरोग्याबद्दल जागृती नाही आणि याच कारणामुळे यकृताचे विकार वाढताना दिसत आहेत व ही येणाऱ्या पिढीसाठी देखील गंभीर गोष्ट आहे.




या गोष्टी लिव्हरसाठी विष आहेत

  1. खूप दारू पिणे
  2. अनहेल्दी फॅट आणि साखरेचे सेवन
  3. अधिक औषधे घेणे
  4. धुम्रपान करणे
  5. अॅल्युमिनियम आणि टेफ्लॉन भांडीमध्ये स्वयंपाक करणे
  6. व्यायाम न करणे
  7. जास्त गोड खाणे
  8. हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणे

या भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका

न्यूट्रिशनिस्ट जुही कपूर यांनी सांगितले की, अॅल्युमिनियम आणि टेफ्लॉनची भांडी लिव्हरसाठी हानिकारक ठरतात. असे मानले जाते की या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने शरीरातील काही केमिकल्स जेवणात वाढतात. ज्यामुळे यकृताचे कार्य बिघडू शकते.

लठ्ठपणा कधीही वाढू देऊ नका

लठ्ठपणा आणि लिव्हरचा आजार यांचा थेट संबंध आहे. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार होऊ शकतो. Better Health Channel च्या मते, या आजारात लिव्हरच्या पेशींमध्ये चरबी जमा होते आणि त्यावर सूज वाढते. हळूहळू हा आजार लिव्हर सिरोसिसपर्यंत पोहोचू शकतो.

लिव्हरवर परिणाम करणारे आजार

  1. हिपॅटायटीस ए
  2. हिपॅटायटीस बी
  3. हिपॅटायटीस सी
  4. एल्कोहॉल एब्यूज
  5. ड्रग ओवरडोज
  6. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग
  7. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग
  8. एक्यूट लिवर फेलियर
  9. लिव्हर सिरोसिस

हेल्दी लिव्हरसाठी करा ही कामे

  1. वजन नेहमी हेल्दी ठेवा
  2. फायबर आणि हेल्दी फॅटने भरपूर असा संतुलित आहार घ्या
  3. दररोज व्यायाम करा
  4. दारूपासून दूर राहा
  5. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका
  6. खाण्यापूर्वी हात चांगले धुवा
  7. हिपॅटायटीस रोखणारी लस घ्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने