३ लाख नोकऱ्या तयार, २०२८ पर्यंत ‘डेटा’ क्षेत्रातील उलाढाल वाढणार

अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमात डेटा सायन्सचा समावेश करण्यात येत आहे. तसेच, डेटाशी संबंधित नव्या उद्योगांमध्ये तरुणांच्या हातांना काम मिळत आहे. या क्षेत्राची सध्या होणारी एकूण वाढ पाहता येत्या पाच वर्षात डेटाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात तब्बल ३ लाख ३० हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत, असा अंदाज या क्षेत्राशी संबंधित संस्थांनी वर्तवला आहे. आधुनिक विज्ञान संगणक क्रांती, माहिती तंत्रज्ञान, मोबाइल इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे सध्याचे चित्र पुरते पालटून गेले आहे. घराघरात डेटा हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे.




डाटा सायन्समध्ये नाविन्यता आणि कल्पकतेला असलेला वाव आणि देशात तसेच परदेशात असलेल्या अनेक संधी यामुळे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. पालकही या पर्यायांविषयी अधिक माहिती घेताना दिसत आहेत. नावीन्यता आणि कल्पकतेला वाव देणारे डेटा विज्ञान जगभरातील इतर देशांप्रमाणे भारतातील तरुणवर्गात खूप लोकप्रिय आहे.

या क्षेत्रात चांगली स्पर्धा पहायला मिळते. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक वेगाने वाढत आहे. असे शिक्षण देणारी अनेक केंद्र देशात आकार घेत आहेत. या क्षेत्रात होणारी एकूण गुंतवणूक आणि वाढता पसारा पाहता येत्या पाच वर्षात नवे रोजगार निर्माण वेग ५७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाच वर्षांत तब्बल ३ लाख ३० हजार तरुणांच्या नोकऱ्या मिळण्याचा अंदाज आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने