मुंबई उपनगरातील नागरिकांचा प्रवासही गारेगार होणार; कुर्ला-बीकेसी मार्गावर १९ एसी डबल डेकर बस

मुंबई उपनगरातील प्रवाशांनाही एसी डबल डेकर बसचा आरामदायी प्रवास घडणार आहे. कुर्ला ते बीकेसी मार्गावर १९ डबल डेकर एसी बस चालवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. यापैकी दहा बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. सध्या केवळ दक्षिण मुंबईत एसी डबल डेकर बस धावत आहेत.




लवकरच आणखी दहा बस उपनगरात कुर्ला ते बीकेसी मार्गावर चालवण्यात येतील. बस क्रमांक ३१० कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुल मार्गावर तसेच बस क्रमांक ३१३ कुर्ला रेल्वे स्थानक ते सांताक्रूझ रेल्वे स्थानक यासह काही मार्गांवर चालवण्यात येतील. बेस्ट उपक्रमाने बस पुरवठादार स्विच मोबिलिटी या संस्थेला एकूण २०० एसी डबल डेकर बसचा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले आहे. त्यापैकी ३९ बस आधीच प्राप्त झाल्या आहेत. उर्वरीत बस मार्च, २०२४पर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. २०० डबल डेकर बस या मुंबईतील १२ बस आगारांतून चालवण्यात येणार आहेत.

बसची संख्या कमीच

बेस्टचा एकूण ताफा २९५२ इतका झाला आहे. जुलै, २०२३मध्ये ३०८२ बसगाड्या होत्या. २०२२मध्ये हीच संख्या ३६३८ होती. ताफ्यातील कमी बसमुळे प्रवाशांचे हाल कायम राहिले आहेत. बसची संख्या वाढवण्यावर अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने