प्रिन्स येतोय! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, शुभमन गिलबाबत मोठी अपडेट

टीम इंडियाला आज दिल्लीमध्ये अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल या सामन्यात खेळताना दिसणार नाही. शुभमन गिल सध्या डेंग्यूशी झुंज देत आहेत. अफगाणिस्ताननंतर टीम इंडियाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यापूर्वी शुभमन गिलच्या पुनरागमनाचे एक मोठे अपडेट समोर आले आहे.




शुभमन गिलबाबत मोठे अपडेट

शुभमन गिल सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. प्लेटलेट कमी झाल्यामुळे त्याला नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता तो लवकरच पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिल अहमदाबादमध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. अशा परिस्थितीत तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. पण गिलसमोर मोठे आव्हान असेल ते मॅच फिट होण्याचे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कायम आहे.

शुभमन गिल आज अहमदाबादला जाण्यासाठी रवाना होणार आहे. क्रिकेटनेक्स्टच्या वृत्तानुसार, “या प्रकरणाशी निगडीत एका सूत्राने सांगितले की, गिल आज चेन्नईहून अहमदाबादला व्यावसायिक विमानाने प्रवास करेल. अहमदाबादमध्येही तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली विश्रांती घेईल.”

विक्रम राठोड यांचे मोठे वक्तव्य

टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी भारत-अफगाणिस्तान सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान गिलबद्दल विचारले असता राठोड म्हणाले की, चेन्नईमध्ये झालेल्या आजारातून तो बरा होत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो हॉटेलमध्ये परतला आहे. तो वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे. तो लवकरच बरा होऊन संघात सामील होईल, अशी आम्हाला आशा आहे.

राठोड यांची आश्वासक टिप्पणी आणि गिल अहमदाबादला रवाना होणार असल्याची बातमी टीम इंडियासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे पण सलामीवीराला सामन्यासाठी तंदुरुस्त होणे सोपे असणार नाही. युवा खेळाडूच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे, परंतु सध्या त्याच्या पुनरागमनाची तारीख निश्चित करणे कठीण होईल.

शुभमन पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार?

अहवालानुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “शुभमन गिलला तंदुरुस्त होण्यासाठी आणि मॅच फिटनेस परत मिळवण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल. यावेळी त्याच्याजागी बदली खेळाडू शोधण्याचा किंवा चर्चा करण्याचा कोणताही विचार नाही कारण व्यवस्थापन त्याला संघ सेटअपमधील एक महत्त्वाचा सदस्य मानत आहे. गिल आधीच सकारात्मक चिन्हे दाखवत आहे आणि लवकरच तो पुनरागमन करेल.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने