World Cup 2023 साठी विराट कोहलीचे विगन डाएट, कसा राहतोय फिट

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. आपले शरीर नेहमी मेंटेन ठेवल्यामुळेच या वर्ल्ड कपमध्ये विराटचा बोलबाला आहे. विराट आपल्या डाएटच्या पोर्शनची अत्यंत काळजी घेतो असंही सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच ‘Times Of India’ मध्ये विराटसाठी नक्की काय मेन्यू सेट करण्यात आला आहे याबाबत लीला पॅलेसमधील शेफ अंशुमन बाली यांनी सांगितले.

नेहमी एनर्जेटिक राहणारा विराट कोहली वर्ल्ड कपसाठी स्पेशल डाएटवर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रोज त्याच्या डाएटमध्ये नक्की कोणते पदार्थ आहेत आणि त्यामुळे विराटच्या फिटनेससाठी किती फायदा होतो जाणून घ्या. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटद्वारे या गोष्टीची पूर्ण काळजी घेण्यात येत असून स्वादिष्ट आणि हेल्दी खाणे देण्यात येते आहे. यामुळे खेळाडूंचा स्टॅमिना, प्रतिकारशक्ती चांगली राहील याची काळजी घेण्यात येत आहे.




लो कार्ब डाएट

विराट कोहली हे कमी कार्बोहायड्रेट असणारे अन्नपदार्थ खातो, असं त्याच्या शेफने सांगितले. विराटच्या खाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. तसंच विराट संपूर्णतः शाकाहारी पदार्थ खातो. विगन डाएटवर विराटचा भर असून दूध अथवा डेअरी प्रॉडक्ट्स अजिबात पित नाही. त्यामुळे प्रोटीनसाठी सोया प्रॉडक्ट्स अथवा टोफूचे सेवन विराट करतो.

उकडलेले पदार्थ खाण्यात येते

विराट कोहली स्टीम करण्यात आलेले पदार्थ खाण्याला अधिक प्राधान्य देतो. यामध्ये मॉक मीट जे शाकाहारी मीट म्हणून ओळखले जाते तेदेखील खाल्ले जाते. तसंच डिमसम पदार्थदेखील विराटला खायला आवडतो असे शेफने सांगितले.

सकाळी नाश्त्यामध्ये अनेकदा विराट ब्राऊन ब्रेडसह पीनट बटर खात असून डिनरमध्ये सूप, सलाड आणि हिरव्या भाज्या खाणे पसंत करतो. याशिवाय ग्लुटनफ्री स्नॅक्स खाणेही विराटला आवडते, ज्यातून शरीराला अधिक कार्बोहायड्रेट मिळते.

धान्याचा डोसा आणि इडली

भात - आमटीऐवजी नाचणीचा डोसा खाण्याला प्राधान्य देण्यात येते. नाचणीच्या या डोशामध्ये लोह, जिंक आणि कॅल्शियमचे अधिक प्रमाण असून दिवसभर एनर्जी टिकून राहाते आणि यामधून शरीराला अधिक पोषक तत्व मिळतात. याशिवाय मिलेट इडली आणि क्विओना इडलीदेखील खाल्ली जाते. रागी डोसा हा अत्यंत चवीने भारतीय क्रिकेट टीम प्रेमाने खाल्ली जाते.

काय आहे विगन डाएट

वेगेन अथवा विगन जे संपूर्णतः प्लांट अर्थात वनस्पतीजन्य पदार्थांवर अवलंबून असते. Vegan Diet मध्ये हिरव्या भाजी, ताजी फळं, कडधान्य, धान्य, डाळी, नट्स, बिया, टोफू, प्लांट बेस्ड ऑईल वापरण्यात येते. यामध्ये कोणतेही डेअरी प्रॉडक्ट्स अथवा अंडे, मांसाहारी पदार्थांचा समावेश करण्यात येत नाही. काही वर्षांपासून विराटने विगन डाएट सुरू केले असून एका मुलाखातीमध्ये आपल्याला अधिक स्ट्राँग असल्याचे वाटल्याचे त्याने सांगितले.

विगन डाएटचे फायदे

  • यामध्ये अँटीऑक्सिडंट जेवण अधिक असून अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते. तसंच रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होत नाहीत
  • या डाएटचा समावेश करून घेतल्यास, कोलेस्ट्रॉलचा त्रास होत नाही कारण यामध्ये Saturated Fats चे प्रमाण कमी असते
  • विगन डाएटमध्ये फळं, भाज्या आणि नट्स अधिक प्रमाणात असून अँटीऑक्सिडंट्स ओमेगा ३ चे प्रमाण अधिक मिळतात. यामुळे नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्या दूर होतात
  • विगन डाएटमध्ये प्रोटीन आणि लोह भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते आणि थकवा जाणवत नाही. तर डाएटमध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि मिनरल्स अधिक प्रमाणात असल्याने शरीर डिटॉक्सस होते आणि तुम्ही अधिक हेल्दी राहता

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने