यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळणार नाही iPhone 13; जाणून घ्या Amazon ग्रेट इंडियन सेलमधील ऑफर

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल सुरु होण्यास आता फक्त काही तास उरले आहेत. हा सेल प्राइम मेम्बर्ससाठी उद्यापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून तर इतरांसाठी ८ ऑक्टोबरपासून सुरु होईल. ह्या सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टीव्हीज, टॅब्लेट्स इत्यादी अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मोठी सूट देणार आहे. अलीकडेच अ‍ॅमेझॉननं iPhone 13 ची सेलमधील किंमत सांगितली आहे आणि ह्या हँडसेटवर मिळणारा डिस्काउंट आणि डील्स अविश्वसनीय आहेत.



iPhone 13 वरील डिस्काउंट

iPhone 13 ची मूळ किंमत ५९,९०० रुपये आहे परंतु सेल दरम्यान हा मोबाइल ४५,९९९ रुपयांमध्ये विकला जाईल. तसेच एसबीआय बँकेच्या ग्राहकांना २५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळवण्याची संधी देखील आहे. त्याचबरोबर जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तुम्हाला ३,५०० रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे ज्यामुळे आयफोन १३ ची किंमत आणखी कमी होईल.

वरील डिस्काउंट, बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस नंतर आयफोन १३ ची इफेक्टिव्ह प्राइस फक्त ३९,९९९ रुपये होईल. ही ह्या आयफोनची आतापर्यंतची सर्वात कमी किंमत असेल. परंतु त्यासाठी तुमच्याकडे एसबीआय बँकेचं कार्ड आणि एक्सचेंज करण्यासाठी एखादा जुना स्मार्टफोन असणं आवश्यक आहे .

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स

ह्या आयफोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे जो ६० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले १२०० निट्झ पीक ब्राइटनेससह बाजारात आला आहे त्यामुळे उन्हात देखील ह्या स्क्रीनवरील कंटेंट स्पष्ट पाहता येतो. ह्यात कंपनीचा ए१५ बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे.

फोनच्या मागे १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तर फ्रंटला देखील १२ मेगापिक्सलचा सेल्फी शुटर देण्यात आहे. रियर कॅमेरा सेटअप २एक्स ऑप्टिकल झूम आणि ५एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. आयफोन १३ नव्या आयओएस १७ ऑपरेटिंग सिस्टमला देखील सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन १२८जीबी, २५६जीबी आणि ५१२जीबी अशा तीन स्टोरेज ऑप्शनसह बाजारात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने