दिवसभरात ८८०० पावले चालणे आरोग्यासाठी लाभदायी

चालण्याचा व्यायाम आणि हृदयरोग, मृत्यू यांच्यातील संबंधाबाबतचे निष्कर्ष संशोधकांनी नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये एक लाख ११ हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी दररोज  ८ हजार ८०० पावले चालणे योग्य आहे. तर, सदृढ हृदयासाठी ७ हजार २०० पावले चालणे फायदेशीर ठरते, असे यामध्ये दिसून आले.




‘ग्रेनाडा युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी सांगितले की, अनेक जण चांगल्या आरोग्यासाठी दररोज १० हजार पावले चालण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला देतात; परंतु आम्ही केलेल्या संशोधनातील निष्कर्षांनुसार सावकाश चालण्याऐवजी जलद चालणे हे अधिक लाभदायी आहे. तसेच दररोज ८ हजार ८०० पावले चालण्याचा व्यायाम हा उपयुक्त आहे. या व्यायामाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदा होतो.

लठ्ठपणाचा धोका कमी करण्यासाठी ८ हजार ८०० पावले चालणे आवश्यक आहे. या व्यायामामुळे शरीरातून घाम येऊन जिवाणू बाहेर पडतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो, असे संशोधकांनी सांगितले.  उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारांपासून दूर राहण्यासाठी चालण्याचा व्यायाम आवर्जून करावा, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने