Buddhist Caves : 'प्राचीन ठेवा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, बौद्ध विहार-गुंफा आणि लेण्यांचा विध्वंस थांबवा'

कोल्हापूर, सातारा आणि सांगली या दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील पर्वतरांगांत साधारण दोन हजार वर्षांपूर्वीचे बौद्ध विहार (Buddhist Vihara), गुंफा व लेणी (Buddhist Caves) आहेत. त्यांच्या संरक्षणाची गरज आहे. याविषयी सामान्य जनता अनभिज्ञ आहे, तर महाराष्ट्र शासन उदासीन. त्यामुळे धर्म, इतिहास व्यापारी मार्गाच्या प्राचीनत्वाची साक्ष उद्ध्वस्त होण्याच्या अवस्थेत आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी व्यक्त करून त्यांनी पुरातत्त्व विभागामार्फत संरक्षणाचे आवाहन केले आहे.




सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी जवळच्या मल्लिकार्जुन मंदिराजवळच्या शिवमंदिरातील बौद्ध गुंफा व विहार आणि खंडेराजुरीजवळील गिरिलिंग व जुना पन्हाळा येथील गुंफा व लेण्यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. डॉ. देसाई यांच्या मते, गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव केवळ भारतातच नव्हे तर ग्रीस, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, भारतात सम्राट अशोकाचे साम्राज्य होते तिथपर्यंत पसरला होता.

महाराष्ट्रात कोल्हापूरला बुद्धांच्या पवित्र अस्थि व रक्षा असणारा स्तूप त्यांनी शोधला. नुकतेच भुदरगड किल्ल्यावरील बौद्ध गुहा त्यांनी उजेडात आणल्या आहेत. पुरातत्त्व विभागाने यांची नोंद करावी, अशी विनंती डॉ. देसाई यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातील बौद्ध लेण्यांचे रूपांतर शिवमंदिरात केल्याचे दिसून आले. यापुढे तरी नैसर्गिक व मानवी कारणाने हा मौल्यवान सांस्कृतिक वारसा उद्‌ध्वस्त होऊ देऊ नये, याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे.’’


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने