केसांवर ब्लो ड्राय करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्यायला विसरू नका

आजकाल केसांच्या विविध प्रकारच्या स्टाईल करण्यावर महिलांचा भर आहे. हेअर स्ट्रेटनिंग, हेअर कॅरेटिन, हेअर स्मूथनिंग इत्यादी प्रकारच्या स्टाईल्स केसांवर केल्या जातात. केस ब्लो ड्राय करण्याकडे ही तरूणींचा आणि महिलांचा कल आहे.

केस ब्लो ड्राय केल्यामुळे केस सरळ होतात आणि केसांना छान चमक येते. मात्र, अनेकदा केस ब्लो ड्राय करताना काही चूका केल्या जातात. ज्या चुकांमुळे केस आणखी खराब होण्याची शक्यता असते.

त्यामुळे, केस ब्लो ड्राय करताना काही गोष्टींची खास काळजी घेणे महत्वाचे आहे. केस ब्लो ड्राय करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? ते आज आपण जाणून घेऊयात.




ओल्या केसांमध्ये करू नका ब्लो ड्राय

ओल्या केसांमध्ये ब्लो ड्राय करणे हे चुकीचे आहे. जर तुम्ही असे करत असाल तर असे करणे टाळा. तुमचे केस कोरडे झाल्यानंतरच त्यावर ब्लो ड्राय करा. सर्वात आधी केस कोरडे करून घ्या त्यानंतर केस विंचरताना ब्लो ड्राय करा. कोरड्या केसांमध्ये ब्लो ड्राय केल्यावर केसांचे नुकसान होत नाही.

टाळूजवळ करू नका ब्लो ड्राय

ब्लो ड्रायरमधून बाहेर पडणारी गरम हवा ही स्काल्प अर्थात तुमच्या टाळूला इजा पोहचवू शकते. तुम्ही किती ही घाईमध्ये असला तरी सुद्धा चुकूनही टाळूजवळ ब्लो ड्राय करू नका. ब्लो ड्राय केसांना करा, मात्र, चुकूनही टाळूजवळ ब्लो ड्राय करू नका.

गरजेपेक्षा जास्त केस सुकवू नका

केसांवर गरजेपेक्षा जास्त ब्लो ड्राय करणे टाळा. जास्त प्रमाणात केस कोरडे केल्यावर केस फ्रिझी होण्याचा धोका असतो. त्यासोबतच, केस निस्तेज दिसू लागतात. परिणामी, केसांची चमक निघून जाते. त्यामुळे, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात केस सुकवू नका.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने