दिवाळीपूर्वी वजन कमी करण्यासाठी आहारात करा 'या' ३ घटकांचा समावेश

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळीचा सण आपल्या देशात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये फराळाची, नव्या कपड्यांची आणि विविध वस्तूंच्या शॉपिंगची नुसतीच रेलचेल असते.

दिवाळीमध्ये सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. ज्यांना वजन कमी करायचे आहे, ते लोक दिवाळीपूर्वी यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात. अनेक प्रयत्न करूनही त्यांचे वजन कमी होत नाही. मात्र, चिंता करू नका. जर तुम्हाला दिवाळी पूर्वी वजन कमी करून स्वत:ला फिट ठेवायचे असेल, तर तुमच्या आहारात या ३ घटकांचा समावेश करा.




वजन कमी करण्यासाठी मदत करतील हे ३ घटक

फळे

फळांमध्ये पोषकघटकांचे आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, फळे ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्यासाठी फळे अतिशय प्रभावी आहेत. फळांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात.

त्यामुळे, वजन कमी होण्यास मदत होते. दिवाळीपूर्वी वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात संत्रा, सफरचंद, लिची, चेरी इत्यादी फळांचा समावेश करा. या फळांच्या मदतीने तुम्ही वजन नक्कीच कमी करू शकता.

चिया सीड्स

वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स अतिशय फायदेशीर मानल्या जातात. चिया सीड्समध्ये प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. या बियांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

या बिया खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. या बियांचा आहारात समावेश केल्याने तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. या चिया सीड्सचा उपाय करण्यासाठी एक चमचा चिया सीड्स एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर, सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या. हा उपाय केल्याने तुमचे वजन लवकरात लवकर कमी होऊ शकते.

कडधान्ये (Sprouts)

स्प्राऊट्सचा आहारात समावेश केल्याने तुमचे वजन लवकरात लवकर कमी होऊ शकते. दिवाळीपूर्वी जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात तुम्ही कडधान्यांचा समावेश आतापासूनच करा.

स्प्राऊट्स अर्थात कडधान्ये यामध्ये सर्वात कमी प्रमाणात कॅलरीजचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, या कडधान्यांचे सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते आणि आपल्या शरीराची चरबीही वाढत नाही.

आपली पचनशक्ती मजबूत करण्यासाठी स्प्राऊट्स अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या ब्रेकफास्टमध्ये मोड आलेली कडधान्ये खाऊ शकता, किंवा या मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलेड खाऊ शकता. या कडधान्यांमध्ये तुम्ही हिरवे मूग, मटकी, हरभरा, हुलगा इत्यादी कडधान्यांचा नाश्त्यामध्ये समावेश करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने